डिकसळच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ज्योती झिटे बिनविरोध
आय मिरर(विजयकुमार गायकवाड)
इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळा डिकसळ येथे शाळा व्यवस्थापन समितीची नियोजित बैठक गुरुवार ( ता .५) रोजी पार पडली या बैठकीमध्ये सर्व पालक प्रतिनिधी मधून एकमताने ज्योती रवींद्र झिटे यांची शाळा व्यवस्थापन समिती डिकसळ च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी गावच्या सरपंच मनीषा गवळी यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .
शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्षपदाची निवड खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सतीश दराडे यांनी समाधान व्यक्त केले व शाळेला चांगल्या प्रकारचे सहकार्य करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या ,शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व भौतिक सुविधा देण्यास शाळा व्यवस्थापन समिती सक्षम असेल अशा भावना याप्रसंगी व्यक्त करण्यात आल्या.यावेळी शाळेसाठी दोन स्मार्ट टीव्ही शाळेला उपलब्ध व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा नूतन काळे, ज्योती झिटे, वर्षा सावंत रूपाली गायकवाड पुष्पांजली शिर्के ,सारिका काकडे ,योगिता काळे,माधुरी झाकणे अर्चना कुंभार कृष्णा गवळी ,स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी दत्तात्रेय पवार, मनीषा भोंग व इयत्ता पहिलीचे नूतन पालक प्रतिनिधी महेश भाट व शाळेच्या उपशिक्षिका सुरेखा वाघ या प्रसंगी उपस्थित होते.
What's Your Reaction?