भिगवण येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज नोंदणी शिबिराचे अंकिता पाटील ठाकरेंच्या उद्घाटन
आय मिरर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे 21 ते 65 वयोगटातील महिलांना आर्थिक सहाय्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे पात्र महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी भिगवण (ता. इंदापूर) येथे शनिवारी (दि.20) केले.
भिगवण येथे राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सुचनेनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आयोजित मोफत अर्ज नोंदणी शिबिराचे उद्घाटन अंकिता पाटील ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले.
या योजनेमध्ये सर्व पात्र महिलांना लाभ मिळावा, एकही पात्र महिला वंचित राहू नये, यासाठी कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका आदींनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही याप्रसंगी अंकिता पाटील ठाकरे यांनी केले.
यावेळी पराग जाधव, तृप्तीताई पराग जाधव, संजय देहाडे, सरपंच दीपिका क्षीरसागर, मुमताज शेख, प्रतिमा देहाडे, मनीषा वाघ, जावेद शेख, कपिल भाकरे, दत्ता धवडे, तुषार क्षीरसागर, देवानंद शेलार, खंडेराव गाडे, सलीम शेख, सलीम मुलानी, सलीम सय्यद, सत्यवान भोसले, अमित वाघ, गुराप्पा पवार आदिसह कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
What's Your Reaction?