इंदापूर तालुक्यातील सर्व पाझर तलाव शंभर टक्के क्षमतेने भरले जाणार - हर्षवर्धन पाटील

Jul 20, 2024 - 13:07
 0  113
इंदापूर तालुक्यातील सर्व पाझर तलाव शंभर टक्के क्षमतेने भरले जाणार - हर्षवर्धन पाटील

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तलाव शंभर टक्के भरून घेण्यासाठी वीर धरणातून रविवारी सकाळी नीरा डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. तर खडकवासला कॅनॉलमधून तरंगवाडी पासून मदनवाडी पर्यंतचे चौदा तलाव देखील 100 टक्के क्षमतेने भरले जाणार असल्याची माहिती भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिलीय.

शेटफळ तलावात सोमवारी 22 जुलै ला रात्रीपर्यंत पोहोचणार आहे.तर खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी पासून ते मदनवाडी पर्यंतच्या सर्व 14 पाझर तलाव भरण्यासाठी रविवार (दि.21) संध्याकाळ पासून कॅनॉल मध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे.

पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. डुबल यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांनी शेटफळ तलाव यासह इंदापूर तालुक्यातील तलाव भरून घेणे संदर्भात चर्चा शनिवारी सकाळी केली. 

भाटघर धरणामध्ये आज दि. 20 जुलै रोजी सुमारे 42 टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्यामुळे शेटफळ तलाव भरून घेण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याने शेटफळ, भोडणी, सुरवड, वकीलवस्ती, बावडा, पिठेवाडी, निरनिमगाव, कचरवाडी(बा.), सराटी, लाखेवाडी या लाभक्षेत्रातील 10 गावांमधील शेतीच्या पाण्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. 

वरकुटे तलाव, वाघाळा तलाव, वालचंदनगर व घोलपवाडी टॅंक भरून घेणार - हर्षवर्धन पाटील

नीरा डावा कालव्यामधून पाण्याने वरकुटे खुर्द तलाव, वाघाळा तलाव, वालचंदनगर पाणी टॅंक व घोलपवाडी साठवण टॅंक हेही भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्या परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी सांगितले.        

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले तसेच कार्यकारी अभियंता कुराडे मॅडम यांच्याशी पाझर तलाव भरून घेणे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी चर्चा केली. त्यानुसार आज शनिवारी दि. 20 व रविवारी दि. 21 अशी 2 दिवस कॅनॉलची स्वच्छता केली जाईल. त्यानंतर कॅनॉलमध्ये रविवारी रात्री पाणी सोडून तरंगवाडी पासून पाझर तलाव भरून देण्यास सुरुवात केली जाईल व तालुक्यातील सर्व पाझर तलाव हे पूर्ण क्षमतेने भरून घेतले जातील. 

या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी, कळस, पिलेवाडी, काळेवाडी, पळसदेव, लोणी देवकर, न्हावी, रुई, गागरगाव, बळपुडी, बिजवडी(वनगळी), वडापुरी, तरंगवाडी या 14 पाझर तलावांच्या परिसरातील गावांचा फायदा होणार आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow