"मलिदा गँग हटाओ इंदापूर बचाओ" चा नारा घेऊन मी तालुका फिरणार - अंकिता पाटील ठाकरे

आय मिरर
मलिदा गँग हटाओ इंदापूर बचाओ हा नारा घेऊन मी तालुका फिरणार आहे.आज गुलाबी गँग येतेय,मलिदा गँग येतेय साड्या दिल्या जात आहेत. पण महिलांना हे आवडत नाही. मामा आणि मामांचे चार बागडबिल्ले हे ठेकेदार आहेत. त्यांनी मागील दहा वर्षात फक्त खिशे भरण्याचे काम केले आहे त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांचं देणं घेणं नाही. साड्या वाटण्यापेक्षा महिलांच्या हाताला रोजगार दिला असता तर काय बिघडलं असतं का ? असं म्हणत आ.भरणेंवर अंकिता पाटील ठाकरे यांनी टीका केली.
इंदापूर विधानसभेच्या प्रत्येक प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ हा व्याहळी गावातील भैरवनाथाला फोडून केला जातो. त्याच भैरवनाथाला नारळ वाढवून अंकिता पाटील ठाकरे यांनी आपल्या जनसंवाद यात्रेला आज रविवार पासून सुरवात केली आहे.आजपासून ही यात्रा तालुक्यातील प्रत्येक गावात वाडीवस्तीवर जाणार असून आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर आपली भुमिका मांडली जाणार आहे.
अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,आज अजित पवारांसोबत असणारे नेते सुरक्षित नसतील तर महाराष्ट्रातील जनता काय सुरक्षित आहे? ही पहिली घटना नाही,वारंवार अशा घटना घडत आहेत. इंदापूरात देखील मागील पंधरवाड्यात अशी घटना घडली. बारामतीत टी सी काॅलेजात ही अशीच घटना घडली.हे पाहता आपण सुरक्षित आहोत का? असा प्रश्न पडतो यासाठीचं संवाद साधण्यासाठी ही जनसंवाद यात्रा काढली असल्याचे अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या.
या दोन कारणांसाठी जनसंवाद यात्रा……
जनसंवाद यात्रा दोन कारणांसाठी काढली असून त्यापैकी एक कारण म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि आपलं पुढचं धोरण काय असेल ते सांगण्यासाठी तर दुसरं कारण म्हणजे इंदापूर तालुक्यात काही लोक सांगताहेत साडेपाच कोटींचा विकास केला आहे तो शोधण्यासाठी ही यात्रा काढली आहे.
आजपासून आपल्याला तालुका पिंजून काढायचा आहे मात्र कोणावर ही टीका करायची नाही.८४ वर्षाच्या योध्याला साथ देण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या मी माझ्या वडिलांसाठी मैदानात उतरले आहे तशीचं मी देखील माझ्या वडिलांसाठी मैदानात उतरली आहे.
सहा दशकापासून पाटील आणि पवार कुटुंबाचे नाते……
मागील दहा वर्षात इंदापूर तालुक्यात जी परिस्थिती निर्माण झाली ती कोणालचं बघवत नाही. खुप संघर्ष आपण केला. संघर्ष आपल्या नशिबाला का आला यासाठी आपण चर्चा करायला हवी.झालं गेलं पण ! जो उठाव तालुक्यातून होत होता तो म्हणजे भाऊ तुम्ही तुतारी घाती घ्या.म्हणूनचं जनतेचं ऐकावं लागलं. मागील सहा दशकापासून आमचे आणि पवार कुटुंबाचे नाते आहे आणि आम्ही ते स्वर्गीय भाऊंपासून जपले आहे.
मी आणि पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते सर्वांपर्यंत जाणार आहोत. संवाद साधणार आहे. मलिदा गँग हटाओ इंदापूर बचाओ हा नारा घेऊन मी तालुका फिरणार आहे.आज गुलाबी गँग येतेय,मलिदा गँग येतेय साड्या दिल्या जात आहेत. पण महिलांना हे आवडत नाही. मामा आणि मामांचे चार बागडबिल्ले हे ठेकेदार आहेत. त्यांनी मागील दहा वर्षात फक्त खिशे भरण्याचे काम केले आहे त्यांना गोरगरिबांच्या प्रश्नांचं देणं घेणं नाही. साड्या वाटण्यापेक्षा महिलांच्या हाताला रोजगार दिला असता तर काय बिघडलं असतं का ? असं म्हणत आ.भरणेंवर अंकिता पाटील ठाकरे यांनी टीका केली.
दहा वर्षात कोणाच्या हाताला रोजगार दिला.कोणाला नोकरी मिळाली.दोन दिवसात आचारसहिंता लागणार आहे म्हणून घेतली पिशवी घातली साडी आणि सुटले सगळीगडे वाटत. पण इंदापूरची जनता हुशार आहे.सर्वांना एकत्र येऊन काम करायचं आहे.महिलांचं सबलिकरण करायचं आहे.यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचं बटन दाबून हर्षवर्धन पाटलांना विजयी करायचे आहे.
मी लेक पाटलांची पणं सून ठाकरेंची…मला ही डरकाळी टाकता येते !
कुठल्याचं प्रकारचा प्रशासनावर वचप राहिला नाही.ही तालुक्यासाठी खूप दुर्दैवी बाब आहे. मी लेक पाटलांची आहे पण सून ठाकरेंची आहे.त्यामुळे तारतम्य बाळगून बोलते.वेळ आल्यावर मला ही डरकाळी टाकता येते हे विरोधकांनी लक्षात घ्याव म्हणत अंकिता पाटील ठाकरेंनी इशारा दिला
आज आपल्या विविध संस्थात सर्व समाजातील ८ ते ९ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.३० ते ४० हजार कुटुंब चांगला संसार करीत आहे. तालुक्यातील औद्योगिक वसाहत आपल्याला आणखी विकसित करायची आहे.त्यासाठी हर्षवर्धन पाटील यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केले.
यावेळी अतुल वाघमोडे,विकास चितारे,बाळासाहेब भोंगळे,बबलु पठाण,राजेंद्र पवार, अँड.आशुतोष भोसले,महिला तालुकाध्यक्षा छाया पडसळकर,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ आदींनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन दादासाहेब गोळे यांनी केले तर आभार वाल्मिक शिंदे यांनी मानले.
What's Your Reaction?






