'त्या सभेची तरी जाणीव ठेवा' आ.रोहित पवारांचा पळसदेव मध्ये आ.भरणेंवर हल्लाबोल

Apr 12, 2024 - 15:33
Apr 12, 2024 - 15:37
 0  912
'त्या सभेची तरी जाणीव ठेवा' आ.रोहित पवारांचा पळसदेव मध्ये आ.भरणेंवर हल्लाबोल

आय मिरर

शरद पवारांनी शेवटची सांगता सभा घेतली याचा ३० ते ४० हजार मतदारात बदल झाला. याची जाणीव इंदापूरच्या लोकप्रतिनिधींनी ठेवायला पाहिजे होती परंतु काही जवळच्या मलिदा गॅंग ला ठेकेदारी मिळवण्यासाठी तुम्ही आज वेगळा निर्णय घेता घेतला अशी टीका आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता दत्तात्रय भरणे यांच्यावर केली.रोहित पवार हे शुक्रवारी दि.12 एप्रिल रोजी पळसदेव(ता.इंदापूर) येथील जाहिर सभेत बोलत होते.

पवार म्हणाले की,इंदापूर तालुक्यात दमदाटी केली जात असून शेतकऱ्यांना पाणी ऊस यावरून धमकावले जात आहे. परंतु उसाची काळजी करू नका जिथे कोठे नोंद दिली असेल ती रद्द करा व बारामती ॲग्रोला द्या असे आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार पळसदेव येथे बोलत होते.लोकसभा निवडणुकीत जर तुम्हाला विद्यमान आमदारांनी धमकावले तर विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करू त्यामुळे कुणीही भिऊ नका असा सल्ला पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

अजित पवार अनेक वेळा दिल्लीला गेले, परंतु शेतकऱ्यांसाठी न जाता पद तिकीट मिळवण्यासाठी गेले परंतु तिकीट मिळाली कीती अवघी चार, लोकसभेला अजित पवारांची ही परिस्थिती असेल तर विधानसभेला काय असेल.? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले देशात व कोणत्याही राज्यात मोदींची लाट राहिली नसून प्रत्येक राज्यात बदल होत आहे.

यावेळी महारुद्र पाटील, अशोक घोगरे,अमोल भिसे, सागर मिसाळ, कालिदास देवकर, निवास शेळके,अमोल देवकाते,निलेश रंधवे,इंदापूर शहराध्यक्ष ॲड.काजी, महिला अध्यक्ष छाया पडसळकर तसेच आम आदमी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना उद्धव ठाकरे काँग्रेस व इतर मित्र पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow