इंदापूरच्या काँग्रेस भवन वरून आता नवा वाद ! मात्र हर्षवर्धन पाटील म्हणतात वास्तुशी काँग्रेसचा संबंध नाही
आय मिरर
इंदापूरच्या काँग्रेस भवना वरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे इंदापूरच्या काँग्रेस भावनांचा ताबा सध्या हर्षवर्धन पाटलांकडे आहे जोपर्यंत काँग्रेस भावनांचा ताबा पुन्हा काँग्रेसकडे येत नाही तोपर्यंत हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी शरद पवारांकडे केलीये.
यावर हर्षवर्धन पाटील यांनी उत्तर दिलेय.या वास्तूशी काँग्रेसचा संबंध नाही. वास्तूला काँग्रेसचे नाव 1966 मध्ये दिले म्हणून ही जागा त्यांच्या मालकीची होत नाही. ही जागा विकत घेऊन तेथे स्वखर्चाने आम्ही इमारत बांधली. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलयं.
हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला होता यानंतर शरद पवार गटातील नाराज नेते आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने भरत शहा यांनी हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलेला आहे आणि त्याचाच भर म्हणून आता आमदार संजय जगताप यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला काँग्रेस भवनावरून विरोध दर्शवला आहे.
मालकी हक्कासंबंधीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार केले - संजय जगतापांचा आरोप
इंदापूर येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून पाटील यांनी मंत्रिपद मिळवले. पाटील यांनी काँग्रेस सोडताना इंदापूर काँग्रेस भवनाच्या आतील भागाची मोडतोड करून इमारतीचे नुकसान केले; तसेच त्यानंतरही कब्जा सोडला नाही. इंदापूर काँग्रेस भवनची इमारत आणि जागा इंदापूर काँग्रेस समितीच्या ताब्यात नाही. मात्र, मालकी हक्कासंबंधीच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून कागदपत्रांवर इंदापूर तालुका काँग्रेस चॅरिटेबल ट्रस्ट असे दर्शविण्यात आले आहे,' असा आरोप जगताप यांनी केला आहे.
इंदापूर काँग्रेसचा ही हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध……
इंदापूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असणारी इंदापूर काँग्रेसची इमारत जोपर्यंत ते पक्षाला परत करत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांचं काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.काँग्रेसची इमारत परत करा मगच आम्ही त्यांचं काम करू असं या तालुकाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर म्हणाले.
What's Your Reaction?