अंकिता पाटील ठाकरेंचा शेती महामंडळ कामगार वारसदारांच्या आमरण उपोषणास पाठींबा

Jul 20, 2024 - 17:28
 0  150
अंकिता पाटील ठाकरेंचा शेती महामंडळ कामगार वारसदारांच्या आमरण उपोषणास पाठींबा

आय मिरर

शेती महामंडळातील कामगार व त्यांच्या वारसांना रहायला दोन गुंठे जागा मिळावे या सह इतर मागण्यांसाठी इंदापूरच्या रत्नपुरी मध्ये कामगारांच्या वासरदारांनी आमरण उपोषण सुरु केलेय.या उपोषणास पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरेंनी भेट देत आपला पाठींबा दर्शवलाय.

दरम्यान भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी फोन वरुन संवाद साधत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बरोबर तात्काळ बैठक घेऊन, सर्व मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढून प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही दिलीय.

वालचंदनगर येथे शेती महामंडळाच्या कामगारांच्या जागा व घराच्या मागणी संदर्भात दि. 18 जुलै पासून बेमुदत उपोषणास बसलेल्या घनश्याम निंबाळकर, हर्षवर्धन गायकवाड, प्रकाश धांडोरे,अतुल बनसोडे या सामाजिक कार्यकर्त्यांची व शेती महामंडळाच्या कामगारांच्या कुटुंबीयांची पुणे जिल्हा भारतीय युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषण स्थळी शनिवारी दि. 20 भेट देऊन त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली. सदर प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी उपोषणकर्त्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.        

हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, शेती महामंडळाच्या कामगारांचे अनेक प्रश्न गेली 30 वर्षांमध्ये सोडवण्यासाठी मी सहकार्य केले आहे. आताही शेती महामंडळाच्या कामगारांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी माझी सहकार्याची भूमिका राहील, त्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन सर्व मागण्या निश्चितपणे सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील.           

यावेळी अंकिता पाटील ठाकरे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्यांना पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गायकवाड, राजेंद्र बोंद्रे, शिवशरण, तसेच शेती महामंडळाचे कामगार व कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow