भाटनिमागंव मध्ये उद्या आ.भरणेंच्या हस्ते ३ कोटी ३१ लक्ष निधीच्या विकास कामाचे भुमिपुजन उद्घाटन
आय मिरर
इंदापूर तालुक्यात सध्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा धडाका सुरू असून तालुक्यातील भाटनिमगाव मध्ये ग्रामपंचायत अंतर्गत ३ कोटी ३१ लक्ष निधीच्या विविध विकास कामांचे भुमिपुजन व उद्घाटन आ. दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि.२१ जानेवारी रोजी सायं. साडेसहा वाजता होणार असून आ.भरणे यांची जाहिर सभा ही पार पडणार आहे.
कोणत्या विकासकामांचा समावेश……
मौजे भाटनिमगांव येथे हरघर जलजीवन योजना करणे १ कोटी २४ लाख, बेडशिंगे ते भाटनिमगांव रस्ता दुरस्ती करणे १ कोटी,शेख फरीदबाबा दर्गा बांधकाम करणे ४० लाख, भाटनिमगांव भैरवनाथ मंदिर सभामंडप दुरस्ती करणे १० लक्ष,भाटनिमगांव बेडशिंगे, रोड ते देवकर बस्ती रस्ता करणे १० लाख,मौजे भाटनिमगांव, महादेव जगताप ते बालाजी मानेवस्ती रस्ता करणे १० लक्ष,भाटनिमगांव चौक ते मनोहर भोसले घर रस्ता करणे १० लक्ष,मौजे भाटनिमगांव शरद गवळी ते भाटनिमगाव चौक रस्ता करणे ७ लक्ष,भाटनिमगांव अशोक गवळी वस्ती रस्ता करणे १० लक्ष,भाटनिमगांव दत्तमंदिर सभामंडप बांधणे ५ लक्ष आणि भाटनिमगांव मारुती मंदीर सभामंडप बांधणे ५ लक्ष अशा विविध विकास कामांचा समावेश आहे
यावेळी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील,अभिजीत तांबिले,श्रीमंत ढोले, सचिन सपकळ,अतुल झगडे,माजी पंचायत समिती सदस्य सचिन पांढरे,बापूराव शेंडे,संग्राम पाटील, दीपक जाधव,नवनाथ रुपनवर,दत्तात्रय घोगरे,साधना केकान, संजय देवकर,संदेश देवकर यांसह हनुमंत जगताप,शिवाजी तरंगे, भागवत काटकर,वडापुरीचे शिवाजी तरंगे, सुभाष गायकवाड, कैलास शिंदे, दिलीप भोंग, नवनाथ डाके, सुनील बोराटे, वसंत मोरे, राजेश अवचर,आबा गाडे,आदित्य शिंदे,आदेश शिंदे,संदेश शिंदे,
ओंकार बन,बाजीराव उंबरे, हनुमंत घोडके, शांतीलाल सावंत,बाळासाहेब जाधव,नाना उंबरे बिभीषण यादव, विलास चव्हाण, सोमनाथ जावळे, सुभाष डांगे,सतीश चित्राव, सरडेवाडीचे सरपंच सिताराम जानकर, दिलीप पाटील,ऋषी देवकर,मारुती कोळेकर,हनुमंत जमदाडे विठ्ठल महाडिक, गणेश बाबर-पाटील, विजय सोनवणे,काशिनाथ ननवरे,आबासो देवकाते,प्रकाश निकम,आनंता ननवरे,दादासाहेब भांगे,प्रवीण बाबर, शहाचे नितीन निकम, तानाजी इजगुडे यांसह भाटनिमगाव परिसरातील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
What's Your Reaction?