'मामा इज अ ग्रेट' फ्रॅक्चर हात गळ्यात बांधून क्रीडामंत्री दत्तात्रय भरणेंनी धरला लग्नात अंतरपाट...

आय मिरर
राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियात चर्चेत असतात, आता देखील एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दत्तात्रय भरणे चर्चेत आले आहेत.
दत्तात्रय भरणे यांच्या उजव्या हाताला फॅक्चर झालंय. फॅक्चर झालेला हात गळ्यात बांधून दत्तात्रय भरणे हे एका विवाह सोहळ्यात सहभागी झाले आणि केवळ सहभागी झाले नाहीत तर नवरदेव आणि नवरीसाठी असणारा अंतरपाट दत्तात्रय भरणे यांनी स्वतः धरत या नववधू वरांना शुभाशीर्वाद दिले. याची चर्चा आता सोशल मीडियात रंगली असून दत्तात्रय भरणे यांचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होतोय.
इंदापूर तालुक्यातील भिगवन मध्ये गायकवाड आणि पंडित या परिवाराचा शुभविवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला दत्तात्रय भरणे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. पुण्यामधील एका व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दत्तात्रय भरणे हे खेळता खेळता पडले आणि यातच दत्तात्रय भरणे यांचा उजवा हात फॅक्चर झाला. तेव्हापासून भरणे यांच्या हातावरती उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार भरणे यांचा हात गळ्यात बांधण्यात आलेला आहे.
असं असलं तरी कार्यकर्त्याला प्राधान्य देत मंत्री भरणे या सोहळ्यात सहभागी झाले.केवळ सहभागी झाले नाहीत तर थेट भरणे यांनी या नव वधूहरांचा अंतरपाट धरला. या नववधूवरांना भरणे यांनी शुभाशीर्वाद दिले आणि याच सोहळ्यातील हा क्षण उपस्थितांना भावला. काहींनी याचा व्हिडिओ बनवला असून तो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यातून भरणे यांचा साधेपणा पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे
What's Your Reaction?






