भाजपा युवा मोर्चा युवकांच्या विकासासाठी प्रयत्नशील- अंकिता पाटील ठाकरे
आय मिरर
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि इंदापूर व्यायाम मंडळ कबड्डी संघाच्या वतीने येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन दि.12 जानेवारी रोजी करण्यात आले होते.भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी स्पर्धेतील खेळाडूशी संवाद साधत महिला व मुलींच्या समवेत प्रेक्षक गॅलरीत बसुन कबड्डी खेळाचा आनंद घेतला यावेळी खेळाडूंची संवाद साधत असताना अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की भाजप युवा मोर्चा युवकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार.
अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की,' भाजप युवा मोर्चा नमो चषकाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात युवकांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त खेळाडू तयार व्हावे हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. भाजप युवा मोर्चा ग्रामीण भागात खेळांच्या विविध स्पर्धेचे आयोजन करून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच युवकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या कबड्डी स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील संघाने मोठा सहभाग नोंदवला आहे.
अंकिता पाटील ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत नमो चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सरचिटणीस अजित मासाळ , वैभव सोलनकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
माजी नगसेवक शेखर पाटील, पृथ्वीराज पाटील , विकास मोरे ,विराज जगताप , सागर गानबोटे ,प्रमोद साबळे ,उमेश कदम , स्वप्निल धुमाळ , मयूर शिंदे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , भाजप शहराध्यक्ष शकीलभाई सय्यद, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तुषार खराडे , भाऊ चोरमले , दादा पिसे, बबलू पठाण , रोहित पाटील , रोहित नलवडे , राहुल वलेकर , शेखर कोकाटे , बापू बोराटे ,लखन पंडित यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक क्रिडासंचालक डॉ.भरत भुजबळ यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. प्रा.बापू घोगरे यांनी आभार मानले.
What's Your Reaction?