"वीस वर्ष नुसत्या घोषणा ,कामाच्या नावानं शून्य" कांदलगावातून आमदार भरणेंचा विरोधकांवर हल्लाबोल
आय मिरर
इंदापूरातील वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीसाठी 37 - 38 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.मात्र काही लोक राजकारण करून तो निधी वाढवून द्या अशी मागणी करतात. मात्र जो निधी मंजूर झाला आहे त्याचे काम तरी अगोदर सुरू केले पाहिजे.गेले वीस वर्ष नुसत्या घोषणा करायच्या आणि कामाच्या नावानं शून्य हे कुठेतरी तपासण्याची गरज आहे. असं म्हणत इंदापूरचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केला आहे.
इंदापूर तालुक्यातील कांदलगाव मध्ये शुक्रवार दिनांक 12 जानेवारी रोजी सायंकाळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 11 कोटी 92 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले यानंतर कांदा गावात झालेल्या जाहीर सभेत भरणे बोलत होते.
भरणे म्हणाले की,निवडणुकीच्या काळात या गावात यायचं, कुठेतरी जातीपातीचे राजकारण करायचं विष पेरायचं, गैरसमज निर्माण करायचा यामुळे या कांदलगाव तरडगाव मधून कुठेतरी तुमच्याकडून माझ्यावर प्रेम कमी झालं आहे हे तुम्हीही मान्य केलं पाहिजे आणि मीही समजून घेतलं पाहिजे म्हणून आमदार भरणे यांनी मतदारांचे कान टोचलेत. जातीपातीचं विष पेरून मतदान मागणाऱ्या माणसाला वेळीच ओळखा.त्या माणसाने तुमच्यासाठी काय केले? गेले वीस-पंचवीस वर्षे तुम्ही त्यांना मतदान दिले मग मुस्लिम बांधवांचे प्रश्न सामाजिक न्यायच्या माध्यमातून असणारे विविध प्रश्न का सुटले नाहीत ? असा सवाल भरणे यांनी केला.
राजकारण राजकारणाच्या ठिकाणी जरूर करू,जी माणसं आपल्याला मदत करतात सहकार्य करतात त्या लोकांचं ऋण व्यक्त करायचं असतं. कोणीही कोणतंही पद जन्माला जात नसतं,मिळालेली खुर्ची ही मिळवण्यासाठी नसते, तिचा उपयोग जनसामान्यांसाठी झाला पाहिजे याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जाण आहे.
"मी आमदारचं बरा लोकसभा अजिबात नको"
या तालुक्याने मला आमदार केले. काल मी कुठेतरी वृत्तपत्रात बातमी वाचली,की दत्तात्रय भरणे हे खासदारकीसाठी इच्छुक आहेत किंवा मैदानात उतरतील.परंतु मी आजही सांगतो मी खासदार व्हावं हे माझ्या आयुष्यात कधीही डोक्यात नाही. ज्या तालुक्याने मला मोठे केले, तुम्ही म्हणाला विधानसभा तेवढ्यापुरताचं माझं बर आहे. कशाला लोकसभा आणि काय करायचंय,कोणीतरी काहीतरी टाकतो बातम्यांचा काहीतरी घोळ करतो.तुमची सेवा हीच माझी सेवा आहे.ज्याला लोकसभेला राहायचे त्यांना राहू द्या आपल्याला त्यात पडायचं नाही. त्या गोष्टीत आपल्याला जायचं नाही.मला काही समजत नाही कोण बातम्या लावतो काय लावतो तुम्ही म्हणाला तर तालुक्यातच तुमची सेवा करेल तुम्हाला माझा कंटाळा आला नाही ना आपला तालुकाचं बरा ! असं म्हणत आमदार दत्तात्रय भरणे यांनी लोकसभेच्या चर्चेंना पूर्णविराम दिला आहे.
भरणे पुढे म्हणाले की, कांदलगावात एवढी मोठी सभा मी कधीही अपेक्षित केली नव्हती.मी या तालुक्यात गेली आठ नऊ वर्षे झाले काम करतो आहे.काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा माणूस मी पाहिला नाही.कोणालाही उंबरे झिजवायला लावले नाहीत.स्वत:च्या खर्चाने गोरगरीब माणसाला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कामाला माणसे ठेवलीत. बांधकाम राज्यमंत्री असताना या तालुक्यात एक व्हीआयपी गेस्ट हाऊस आणि कामगारांच्या कॉर्टर साठी साडेसहा कोटी रुपये मंजूर केले. मात्र त्या कामाच्या भूमिपूजनाच्या फलकावर चुकून खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव राहिले गेले मात्र त्याचे मोठे राजकारण झाले. आज तालुक्यात नऊ साडेनऊ वर्षात एवढा विकास आणला त्याचे पत्रकारांनी अभिनंदन करायला पाहिजे होते. तालुक्याला चांगल्या प्रकारच्या इमारती रस्ते आले मात्र कौतिक करायचे सोडून काही मंडळी गावात ज्यांना कुठल्याही प्रकारची किंमत नाही अशी माणसे कुठेतरी घोषणा करतात आणि त्याचे हेडिंग मात्र मोठे येतं असं म्हणत आमदार भरणे यांनी त्या प्रकरणाबद्दल नाराजी व्यक्त केली. आता या लोकांची आयडेंटिटी चेक केली पाहिजे, पाठीमागे ही लोकं कोण होती, यांनी काय काय उद्योग भानगडी केल्या आहेत अशा लोकांना आता खड्यासारखं बाजूला केलं पाहिजे असंही भरणे यांनी म्हटलं आहे.
आज स्वर्गीय. भास्करराव पाटील यांची आठवण येते, त्या लोकांची काय मागणी होती? तुम्ही ज्या लोकांना मोठे केले त्यांना मदत केली,या गावाने माझ्यावरती प्रेम केलं नाही असं मी म्हणणार नाही परंतु ते कमी केलं.पण माझ्या मनात कधी असं वाटलं नाही की या लोकांनी माझ्यावर कमी प्रेम केलं. तरीही आपल्या गावातील हा महत्त्वाचा रस्ता मंत्री असताना कसा होईल यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला.
कांदलगावला बुद्ध विहार साठी वीस लाख रुपये दिले आहेत. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना कांदलगावात आल्यावर मी मुस्लिम दफन भूमीपर्यंत गेलो होतो. उद्घाटनाला आम्ही कमी जातो पण आज तालुक्यात कोणतं गाव नाही की जिथे मी पोहोचलो नाही माझं काम पोहोचलं नाही.
जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले की, या तालुक्यात जो विकास आमदार भरणेंच्या माध्यमातून झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्यामुळे झाला.अजित पवार सत्तेत बसले बरोबर विकास पाहिजे तिथे आला. मामा आमदाराचे मंत्री झाले आणि काय चमत्कार घडला या तालुक्यातील वाडीवस्तीने पाहिला.बारामती इंदापूर हे वेगळे नाते आहे.दादांनी घेतलेल्या निर्णयाबरोबर भविष्यात तुम्हाला यावे लागेल सत्य सांगावे लागेल. भावनेच्या आहारी जावून चालत नाही.कांदलगांव तरडगांव मधील काही फुटके पुढारी विरोध करतील मात्र ज्यांना विकास दिसतो ते पाठीशी खंबीरपणे उभे राहतील.लोकांच्या समस्या सोडवाव्या लागतील,तरुण पिढीला रिझर्ट पाहिजे यासाठीच आम्ही अजित पवार यांना साथ दिली आहे नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी अजित पवार यांनी त्यांना साथ दिली आहे कारण या देशाचा जगभर डंका कोणी केला असेल तर तो फक्त मोदींमुळे झाला हे नाकारता येणार नाही. विकास हा फक्त महाराष्ट्रामुळेच होत नाही त्याला दिल्लीची ही साथ लागते तेव्हा एवढ्या मोठ्या पध्दतीने विकास होऊ शकतो. यासाठी अजितदादांनी मोदींना साथ देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला देखील तो विचार डोळ्यासमोर ठेऊन उद्याच्या लोकसभेला तुम्हा आम्हाला मतदान करावे लागेल.या परिसरात चारशे पाचशे कोटी रुपयाची विकास कामे झाली.त्यामुळे मी या भागातील नागरिकांच्या वतीने मी आमदार भरणे यांचे आभार मानतो असे गारटकर म्हणाले.
युवकांना मला एक सल्ला द्यायचा आहे की व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, ताठ मानेने जगले पाहिजे. राजकारण समाजकारण करताना अगोदर स्वतःचे कुटुंब उभं केलं पाहिजे ज्या अपेक्षा आपण करतो त्यासाठी आपण आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.सर्वांना बतोबर घेऊन चाला जे खर तर खर आणि धाडसाने बोला. तिळगुळ घ्या गोड बोला पण आता तिळगुळ घ्या आणि खरं बोला म्हणायची वेळ आली आहे.
अभिजित तांबिले म्हणाले की, कांदलगाव तरडगाव भागातील रस्त्याची दुरावस्था होती ते स्वतः कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी अनुभवली पाहिली मी स्वतः त्याचा साक्षीदार होतो आणि ती बाब त्यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यापर्यंत पोहोचवली. तरडगाव कांदलगाव भांगे हा रस्ता 1956 पासून प्रलंबित होता. 1956 पासून या भागातील ग्रामस्थांनी हाल आपेष्टा सोसल्या आहेत. मात्र 1956 पासून जो खुंटलेला विकास होता तो आमदार म्हणे यांच्या माध्यमातून झाला आहे. आमदार भरणे यांनी प्रामाणिक काम केले आहे भविष्यात आपण देखील प्रामाणिकपणे काम करण्याची वेळ आली आहे. 2019 ची सल आता भरून काढावी लागेल. काही महिन्यावर कांदळगाव ग्रामपंचायत ची निवडणूक आहे. गावाजवळ भ्रष्टाचार झाला आणि स्थानिक युवकांच्या माध्यमातून तो बाहेर पडला उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या युवकांना न्याय मिळाला तरीही या युवकांची खंत आहे की जो 39 लाख रुपयांचा निधीचा गैरवापर झाला तो परत आणण्याचे काम आपण करावे. मामाच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा परिषद वरती काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे घराघरापर्यंत मी पोहोचलो. पाठीमागच्या वेळेस कुठे कमी पडलो असलो तरी आम्ही तळमळीने काम केले आणि भविष्यात शेवटच्या श्वासापर्यंत प्रामाणिकच काम करणार आहे. त्यामुळे उद्याचा आ.भरणे यांचा विजय हा निश्चित आहे असा विश्वास तांबिले यांनी व्यक्त केला.
सतिश पांढरे म्हणाले, कांदलगाव तरडगाव साठी अकरा कोटीचा निधी दिल्यानंतर परवाच डीपीडीसीच्या माध्यमातून 44 लाख रुपये निधी विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. तरडगाव कांदलगाव चा गेल्या 20 ते 25 वर्षात जो विकास खुंटला होता तो भरून काढण्याचं काम आमदार भरणे यांनी केले आहे. तरडगाव मधील विविध रस्त्यांकरीता लाखो रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 11 कोटी 92 लाख रुपयांचा जो निधी तरडगाव कांदलगाव साठी देण्यात आला त्यात मधुकर भरणे यांचा सिंहाचा वाटा आहे. मधुकर भरणे यांनी स्वतः या परिसरातील रस्त्यांची दुरावस्था पाहिली आणि आमदार होणे यांना व्यथा सांगितल्या तेव्हा हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला.
दिपक जाधव म्हणाले की, मामांनी मला विचारलं की तुम्ही आमच्याकडे आला आहात कांदलगांव चे रस्त्याचे काम करताय का? ज्या पद्धतीने गावातल्या लोकांनी सांगितलं की वीस वर्षे हे गाव विकासापासून वंचित होतं तसेच आम्ही सुद्धा 2004 पासून मामा सगळ्याच गोष्टी पासून वंचित होतो. माझ्याकडे 2010 पासून सगळी यंत्रणा होती पण आम्ही असे आशेवर होतो की आम्हाला कुठेतरी पुढे जाऊन एखादं चांगलं मोठं काम या ठिकाणी मिळेल परंतु शेवटी विकासाची गंगा ही मामांच्या हातून या इंदापूर तालुक्यात आली म्हणून आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की आपण सुद्धा विकासाबरोबर राहिला पाहिजे आणि आम्ही निर्णय घेऊन मामाकडे आलो.आता या वेळेस बारा कोटींची भूमिपूजने उद्घाटने झाली आहेत.कांदलगांव ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीचा ताब्यामध्ये आली तर येणाऱ्या काळामध्ये मामांच्या माध्यमातून या ग्रामपंचायतचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही.
आमदार भरणेंकडून कोट्यावधीच्या निधीची घोषणा …
दरम्यान ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यानुसार आ.भरणे यांनी ओपन जीम पेव्हर ब्लाॅक साठी ५ लाख रुपये, बंधिस्त गटार लाईन साठी १० लाख रुपये, जोगेश्वरी मंदीर ते शंभुराजे चौक पर्यंत काँक्रेट रस्ता करण्यासाठी ५० लाख रुपये, दफणभुमी संरक्षक भिंत सुशोभिकरण २० लाख ,स्मशानभुमी संरक्षक भिंत सुशोभिकरण २० लाख, जोगेश्वरी मंदीर सभामंडप सुशोभिकरण १० लाख रुपये निधी देण्याची घोषणा केली.कांदलगांव ला चार बाजुने पाणी आहे याचा विचार करता भविष्यात या परिसरात पर्यटन विकास करावा अशी मागणी तरुणांनी केली होती यास ही भरणे यांनी समर्थन दर्शवले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, श्रीमंत ढोले, अभिजीत तांबिले,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे,माजी पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे,सचिन सपकळ,दिपक जाधव, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष संजय सोनवणे, इंदापूर नगरपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते पोपट शिंदे माजी नगरसेवक अमर गाडे, सरडेवाडीचे सरपंच सिताराम जानकर ग्रामपंचायत सदस्य सतीश चित्राव,हनुमंत जमदाडे,शहा गावचे ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील,रमेश शिंदे,बाळासाहेब व्यवहारे,शिवाजी तरंगे,मनोहर भोसले,विष्णू पाटील,यांसह कांदलगांव व तरडगांव ग्रामपंचायतीचे आजी माजी सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गणेश बाबर पाटील, समाधान जगताप, सागर जगताप, सहदेव सरडे यांनी मनोगत व्यक्त करीत गावच्या समस्या आ.भरणे यांपुढे मांडत त्या सोडवण्याची मागणी केली. झगडेवाडीचे सरपंच अतुल झगडे,तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी ही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक वसंत आरडे यांनी केले तर आभार अँड.नितिन भोसले यांनी मानले.
What's Your Reaction?