तरुण पिढी मोबाईलच्या आहारी ; मैदानी खेळ दुरावत चालले - प्रवीण माने 

Dec 18, 2023 - 17:49
 0  263
तरुण पिढी मोबाईलच्या आहारी ; मैदानी खेळ दुरावत चालले - प्रवीण माने 

आय मिरर

तरुण पिढी मोबाईलच्या आहारी गेली असून यामुळे मैदानी खेळ दुरावत चालले असल्याचे मत पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावामध्ये राज्यस्तरीय हॉलि्बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रवीण माने बोलत होते.

यावेळी बोलताना प्रवीण माने म्हणाले मैदानी खेळामुळे आरोग्य तंदुरुस्त राहते, युवकांनी काही वेळ तरी मैदानी खेळासाठी दिला पाहिजे, यावेळी त्यांनी स्पर्धेच्या आयोजकांचेही कौतुक केले.

हॉलीबॉल स्पर्धांचे सामने हे सलग दोन दिवस व रात्र चालणार असल्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.या स्पर्धेत ९० ते १०० संघ यामध्ये सहभागी झाले आहेत. धाराशिव, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, वैराग, बार्शी,लातूर, मुरुड तसेच हरियाणा, पंजाब व राजस्थान या राज्यांतून संघ आले आहेत.

यावेळी इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष राजेश जामदार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव अरबाज भाई शेख, बारामती लोकसभा मतदार संघाचे युवक अध्यक्ष अक्षय कोकाटे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अनिकेत निंबाळकर, इंदापूर तालुका सहकार विभागाचे अध्यक्ष किसन जावळे, तसेच बेलवाडी ग्रामपंचायतचे सर्व आजी-माजी सदस्य व सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष वैभव जामदार व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उपाध्यक्ष अँड. सुजित गायकवाड यांनी केले.या वेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश पवार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. यावेळी अँड. सुजित गायकवाड यांनी बोलताना प्रविण माने यांचा भावी आमदार असा उल्लेख केला यावेळी उपस्थित तरुणांनी मोठा जल्लोष केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow