साहेबांनी उभारलेल्या शिक्षण संस्थांमुळे अनेकांच्या घरात शिक्षणाची चूल पेटली : राजवर्धन पाटील
आय मिरर
इंदापूर तालुक्यात शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन हर्षवर्धन पाटील यांनी अनेक शिक्षणसंस्था उभ्या केल्या, त्या उत्तमरीत्या सुरू आहेत. यामुळे अनेक गोरगरीब मुलांना शिक्षणाची सोय झाली. यामुळे शिक्षणाचे महत्व लोकांना समजले. यातून अनेकांच्या घरात शिक्षणाची चूल पेटली. असे प्रतिपादन निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना कला महाविद्यालय, भिगवण आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिर समारोप समारंभास निरगुडे येथे संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांनी अनेकांना शैक्षणिक मदत केली. यामुळे अनेकजण सध्या आपल्या पायावर उभे आहेत. सध्या इंदापूर तालुका शिक्षणात अग्रेसर आहे. आता बाहेरगावी न जाता अनेक विद्यार्थी इंदापूरमध्येच शिक्षण घेऊ लागले आहेत. यातून अनेकजण परदेशात देखील उच्च पदावर कार्यरत आहेत. हे केवळ शिक्षणामुळे शक्य झाले आहे. येणाऱ्या काळात देखील समाजातील कोणताही घटक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे. या वृत्तीवर चालून शिक्षणाच्या प्रवाहात सर्वांनी आलं पाहिजे. यामुळे आपला देश जगाच्या पाठीवर सर्वात पुढे जाईल, असे देखील राजवर्धन पाटील म्हणाले.
यावेळी एपीआय भिगवन पोलीस स्टेशन दिलीप पवार साहेब , भाजप युवा अध्यक्ष तुषार खराडे सरपंच सौ गौरी प्रदीप सोनवणे, उपसरपंच हनुमंत बबनराव काजळे, ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र राऊत, विनायक रणधीर, अमोल पवार, बायडाबाई खंडाळे, शालेय समितीचे अध्यक्ष अनिल खाडे, उपाध्यक्ष संदीप गायकवाड, जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक दराडे सर व त्यांचा पूर्ण स्टॉप लिंबराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मुंडे सर व सर्व शिक्षक वर्ग आरोग्य सेविका रेणुका कुलकर्णी व आशा वर्कर स्वाती राऊत ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सूर्यकांत गायकवाड व इतर मान्यवर, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
What's Your Reaction?