पुरंदर मधील रावडेवाडी येथे एकाचा खून तर तीन जण जखमी

Sep 30, 2023 - 06:53
 0  4328
पुरंदर मधील रावडेवाडी येथे एकाचा खून तर तीन जण जखमी

आय मिरर

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी येथे एकाचा खून करण्यात आला आहे.तर तीन जण गंभीर तजखमी झाले आहेत.रावडेवाडी येथे शुक्रवारी दि.२९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत.

यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे.तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.तर यामधील आरोपींची संख्या मोठी असल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विविध ठिकाणी आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहेत.आरोपीं पैकी काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले आहे हत्येचं कारण अद्यापही कळून आले नसून यासंदर्भात पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow