उजनीत शहा गावच्या परिसरात सोडलं साडेदहा लाख स्थानिक प्रजातींचं मत्स्यबीज
आय मिरर
राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून इंदापूर मधील उजनी जलाशयात शहा गावच्या परिसरात साडेदहा लाख मत्स्य बोटुकली सोडण्यात आली आहेत,रोहु,कटला यासारख्या स्थानिक प्रजांतींची ही बोटुकली असल्यानं यामुळे मच्छीमारांना सुगीचे दिवस येणार आहेत
इंदापूर तालुक्यातील कुंभारगांव मध्ये दि.०३ डिसेंबर रोजी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उजनी जलाशयामध्ये 1 कोटी मत्स्यबोटुकली संचयन महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला होता. गेल्या २८ वर्षानंतर प्रथमच उजनीत मत्स्य बोटुकली सोडण्यात आली असून मच्छीमारांनी लहान माशांची शिकार करु नये असं आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी मच्छीमारांना केले होते.
उजनी पट्यात भीमा नदी पात्रात राज्य शासनाकडून टप्प्याटप्प्याने ही मत्स्य बोटुकली सोडली जात असून बुधवारी दिनांक 13 डिसेंबर रोजी शहा परिसरात साडेदहा लाख बुटुकली सोडण्यात आली आहेत यावेळी मत्स्य विभागाचे भीमाशंकर पाटील, कालवा निरीक्षक सचिन मोहिते, नंदकुमार नगरे, सिताराम नगरे यांसह स्थानिक मच्छिमार आणि शहा गावच्या महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What's Your Reaction?