विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे सरडेवाडीत जल्लोषात स्वागत
आय मिरर
सरडेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा चित्ररथाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले,यावेळी सरडेवाडी गावचे सरपंच सिताराम जानकर व उपसरपंच रवींद्र सरडे यांनी या चित्ररथाला पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
यावेळी सतीश चित्राव,हनुमंत जमदाडे,गोकुळ कोकरे,प्रियंका शिद,विजय शिद,वैशाली शिद,सुप्रिया कोळेकर,शिवाजी माने,वैशाली कोळेकर,गयाबाई तोबरे,अलका कडाळे,ग्रामसेविका स्वाती चव्हाण उपस्थित होत्या.भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचावेत यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा नावाची देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून राबवली जात असल्याची माहिती सरपंच जानकर यांनी दिली.आभार उपसरपंच रविंद्र सरडे यांनी मानले.
What's Your Reaction?