श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून बारामतीत स्वच्छता अभियान,20 टनांपेक्षा जास्त कच-याचे संकलन

Mar 2, 2025 - 14:26
Mar 2, 2025 - 20:23
 0  158
श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून बारामतीत स्वच्छता अभियान,20 टनांपेक्षा जास्त कच-याचे संकलन

आय मिरर

श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.. या अभियानात 20 टनापेक्षा जास्त कचऱ्याचे संकलन करण्यात आलेय. 

डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आज देशभर हा स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविला जात आहे. प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप, विहिरी आणि तलावातील गाळ काढून पाण्याचे शुद्धीकरण करणे असे सामाजिक उपक्रम राबविले जातात.

त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतल्या श्री स्वामी समर्थ बैठकीच्या सेवेकरांनी जळूची भागात स्वच्छता अभियान राबविले. या उपक्रमात 400 सेवेकरांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती बैठकीचे अध्यक्ष बाळासाहेब बनकर यांनी दिली.

श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान ही एक सेवाभावी संस्था असून गेल्या 80 वर्षापासून या प्रतिष्ठानकडून श्री समर्थ बैठकीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे अखंड कार्य सुरू आहे.समाजामध्ये असलेले अज्ञान अंधश्रद्धा तसेच अनिष्ट रूढी परंपरा व व्यसनाधीनता याचे आपल्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम याची जाणीव करून दिली जाते तसेच त्यापासून वेगळे होण्याची शिकवण दिली जाते.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी अभियान चालवली जातात.जसे वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबिर, जल पुनर्भरण, विहिरी व तलावांच्या गाळ काढणे,स्पर्धा परीक्षा करता विद्यार्थ्यांना, मोफत मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांना, मोफत शालेय साहित्य वाटप, मोफत श्रवण यंत्राचे वाटप.

आपल्या निरोगी आयुष्यासाठी जशी मनाची स्वच्छता गरजेची आहे त्याचबरोबर परिसराची स्वच्छता आवश्यकता आहे व स्वच्छतेचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रविवारी 2 मार्च 2025 रोजी संपूर्ण देशभरात एकाच वेळी स्वच्छता अभियान आयोजित केलेले आहे.

बारामती येथे प्रतिष्ठानच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती जळोची बारामती येथे अभियानात 456 श्री सदस्यांनी सहभाग घेतला व कचरा ओला कचरा 17.5 टन व सुका कचरा 4 टन असा एकूण 21.5 टन संकलन करून 21,281 चौ. मीटर व 4.5 किलोमीटर रोड परिसर स्वच्छ केला आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow