इंदापुरातील श्री.आर.के. शहा विद्यालयात लुटले विचारांचे वाण

Feb 3, 2024 - 16:41
 0  50
इंदापुरातील श्री.आर.के. शहा विद्यालयात लुटले विचारांचे वाण

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापूर शहर विकास प्रतिष्ठान संचलित श्री. रणछोडदास कल्याणदास शहा विद्यालय इंदापूर येथे हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करणयात आले होते. या कार्यक्रमासाठी संस्थेच्या पदाधिकारी सौ.उमा गिरीश शहा व सौ.अर्पिता आदित्य शहा उपस्थित होत्या.

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमापासून अनभिज्ञ असलेल्या मुस्लिम महिला भगिनींना सहभागी करून त्यांना तिळगुळ व वाण देण्याचा अभिनव असा उपक्रम शाळेत घेण्यात आला. शाळेच्या परिसरात आनंददायी वातावरणात विचारांची देवाण-घेवाण होण्यासाठी तसेच भारतीय परंपरा जोपासत हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी सामाजिक बांधिलकी जपत हिंदू महिलांना आणि परिसरातील सर्व पालकांना या कार्यक्रमात सहभागी करून हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना निर्माण झाली सर्व महिलांनी वाण लुटले.यावेळी परिसरातील शाळा व्यवस्थापन समिती सदस्या, सर्व पालक महिला भगिनी उपस्थित होत्या.शाळेतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow