गोवा हजरत निजामुद्दीन रेल्वेच्या चाकातून निघाला धूर... पुरंदरच्या नीरा स्टेशनवर काय घडलं

Mar 2, 2025 - 14:42
 0  545
गोवा हजरत निजामुद्दीन रेल्वेच्या चाकातून निघाला धूर... पुरंदरच्या नीरा स्टेशनवर काय घडलं

आय मिरर(राहुल शिंदे) 

मिरज पुणे लोहमार्गावर वास्को निजामुद्दीन गाडीस होणार मोठा अपघात रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला गेला आहे. गोव्यावरून निघालेली हजरत निजामुद्दीनकडे जाणाऱ्या गाडीच्या चाकातून अचानक धूर येताना दिसून आला.

नीरा रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांनी ही घटना पाहिली आणि तात्काळ ही गाडी थांबवली त्यामुळे पुढे होणारा मोठा अपघात टळला गेला आहे. पाच तासाच्या कालावधीनंतर या रेल्वेचा तो बिघाड झालेला डबा नीरा रेल्वे स्टेशनवर सोडून ही रेल्वे पुढे मार्गस्थ झाली आहे.मात्र त्यामुळे पाच तासांहून आधी वेळ मिरज पुणे रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता.

गोवा येथून हजरत निजामुद्दीनकडे निघालेली रेल्वे नीरा रेल्वे स्टेशनमधून पहाटे पाचच्या सुमारास जात असताना एम.२ डब्याच्या एका चाकातून आग दिसून आली. नीरा रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्या गाडीच्या गार्डला लाला सिग्नल दिला. गाडी आहे त्या स्थितीत सकाळी आठ वाजेपर्यंत तशी उभी होती.

यामुळे मागुन येणारी पहाटेची सह्याद्री एक्सप्रेस, दर्शन एक्सप्रेस, पुणे सातारा डेमो या प्रवासी गाड्या मागे अडकून पडल्या. यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow