डिकसळ कोंढारचिंचोली पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला

Dec 10, 2023 - 21:04
 0  629
डिकसळ कोंढारचिंचोली पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला

आय मिरर विजयकुमार गायकवाड

पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याला जोडणारा व करमाळा, कर्जत, दौंड, इंदापूर ,बारामती या तालुक्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाचे काम चालू झाले असून या कामाची पाहणी कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले यांनी केली.

यावेळी या कामाच्या गुणवत्तेविषयी कुठलीही तडजोड केली जाणार नसुन हा पुल अधिक दर्जेदार व्हावा म्हणून अधिकचे लक्ष घालणार असल्याचे सरपंच भोसले यांनी सांगितले.यावेळी या कामा संदर्भात परिसरातील सर्व नागरिकांचे सहकार्य लाभणार असल्याचे कोंढार चिंचोलीचे सरपंच शरद भोसले यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow