बिग ब्रेकिंग | बारामती सोरटेवाडी खून प्रकरणातील दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

आय मिरर
बारामती तालुक्यातील मासाळवस्ती सोरटेवाडी येथे व्याजाने दिलेल्या 15 लाख रुपयांच्या देवाणघेवाणीतून 6 एप्रिलच्या मध्यरात्री रोहित सुरेश गाडेकर या 27 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला होता. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी खेड तालुक्यातील बहुल येथून ताब्यात घेतलेय. सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मासाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सोरटेवाडी गावाच्या हद्दीत शेंडकरवाडी रोडचे लहान पुलावर सहा एप्रिलच्या मध्यरात्री ही घटना घडली होती.या संदर्भात वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात बारामती तालुक्यातील सोरटेवाडी येथील अमोल वसंत माने आणि सागर वसंत माने यांच्या विरोधात अविनाश सुरेश गाडेकर याच्या फिर्यादीवरून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मयत रोहित गाडेकर याने आणि माने यांच्यात पैशाचा आर्थिक व्यवहार झालेला होता. यातूनच सोरटेवाडी गावाच्या हद्दीतील शेंडकरवाडी रोडच्या लहान पुलावर त्यांच्यात वाद झाले. त्यातूनच रोहित गाडेकर याचा खून झाला. त्यानंतर घटनेतील आरोपी फरार झाले. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता.
चाकण पोलिसांना या घटनेतील आरोपी खेड तालुक्यातील बहुल येथे एका गोठ्यावर लपून बसले आहेत याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड ,पोलीस अंमलदार हनुमंत कांबळे ,सुनील भागवत, रेवन खेडकर, शरद खेरणार, महेश कोळी यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन सागर वसंत माने आणि विक्रम काकासो मासाळ या दोघांना पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे करीत आहेत.
What's Your Reaction?






