राज्यात युती मात्र इंदापुरात श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून बिनसलं ? भाजपा आणि शिंदे गटाचे पदाधिकारी निवडणूक लढण्यावर ठाम

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. याला अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल भवानीनगर येथे सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली आणि यात पृथ्वीराज जाचक यांच्या सोबत संधान बांधत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किंवा एकतर्फी करण्यासाठी समविचारी लोकांना एकत्र घेऊन निवडणूक लढण्याचं अजित पवारांनी घोषित केलं.
मात्र आता अजित पवारांच्या या निर्णयाला महायुती मधील नेत्यांनीच विरोध दर्शवलाय. भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आम्ही लढवणार असल्याचं घोषित केलंय. त्यामुळे भाजपा शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यात सत्तेत एकत्र असली तरी त्यांच्यात स्थानिक पातळीवर मात्र साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून बिनसल्याच दिसत आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या मुद्द्यावरून कारखान्याचे माजी संचालक व भाजपचे किसान मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात आणि शिंदे गटाच्या काही पदाधिकारी यांनी या संदर्भात सोमवारी 7 एप्रिल रोजी एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
या पत्रकार परिषदेला भाजपचे अविनाश मोटे,रणजीत पाटील, रविंद्र यादव,गोविंद देवकाते,अभिजित देवकाते,संदीप मुलमुले,गणेश जाधव, योगेश थोरात तर शिंदे गटाचे रामभाऊ जामदार, देवेंद्र बनकर,भीमराव भोसले आदी उपस्थित होते असंही तानाजी थोरात यांनी सांगितले.
या संदर्भात तानाजी थोरात म्हणाले की,आम्ही श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवणार आहोत. कारखान्याच्या सभासदांना स्वाभिमानाची वागणूक मिळावी यासाठी निवडणूक लढणार आहोत. निवडणुकीत हार जीत ठरलेली असते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कालच्या सर्वपक्षीय मेळाव्यात निवडणूक बिनविरोध झाली नाही तर एकतर्फी निवडणूक करू असं वक्तव्य केले. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला कोणीही हौसे नवसे गवसे उमेदवारी भरतील असंही वक्तव्य केले आहे. यामुळे सभासदांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
स्वतःचं संचालक मंडळ भ्रष्ट आहे म्हणून तुम्ही तिथे सांगता पण पाच-सहा वर्ष तुम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देत नाही. या सगळ्याच्या विरोधामध्ये आणि कारखान्याला पूर्वीचे गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक आम्ही लढणार.
आम्ही पृथ्वीराज जाचक यांसोबत काम केलं आहे परंतु त्यावेळी त्यांचे रंग आम्हाला माहीत नव्हते. मागील वेळेस हा पृथ्वीराज जाचक गद्दार माणूस आहे असं अजित पवारांनी त्यांच्या जाहीर सभेत सांगितलं होतं. आज तोच गद्दार माणूस तुमच्या बरोबर काम करायला तयार होतोय नेमका काय चमत्कार झाला. गेले वीस बावीस वर्षे पृथ्वीराज जाचक हे तुमचे विरोधक म्हणून काम करतात मग एका रात्रीत तुमचे साठ लोटं होतं याचा अर्थ तुम्ही वीस बावीस वर्षे सभासदांना झुलवत ठेवत होता का ? असाही सवाल तानाजी थोरात यांनी उपस्थित केला.
कारखाना अडचणीत आहे म्हणणं चुकीच आहे कारण आतापर्यंत निवडणूक आयोगाला कारखान्याचे 34 लाख भरले आहेत. मग निवडणूक झाली तर कारखाना तोट्यात जायचं काय कारण आहे.आज कारखान्यावर 200 - 300 कोटी रुपयांचं कर्ज झालं म्हणून सांगता मग कारखाना तुमच्या ताब्यात आहे मग एवढे वर्ष तुम्ही त्याकडे डोळेझाक का केली. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि शिंदे गटाचे पदाधिकारी या सोबतच समविचारी लोक सोबत घेऊन आम्ही आमचं पॅनल तयार ठेवल आहे.
जर वरिष्ठांचा आदेश आला तर तुम्ही काय कराल असं माध्यमाने थोरात यांना विचारलं असता ते म्हणाले की सहजासहजी अशा निवडणुकात वरिष्ठ लक्ष घालत नाहीत.वरिष्ठांनी सांगितले की प्रत्येक निवडणुका या महायुतीत लढा आम्ही आजपर्यंत लढवल्या.मग कारखान्यासारख्या निवडणुका आमच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा समविचारी लोकांनी लढवायच्याच नाहीत अस पक्ष सुद्धा आम्हाला सांगणार नाही ना.
कोण जाचक ? थोरात यांचा सवाल
अजित पवारांचे नेतृत्व आम्ही मान्य करतो ते आमच्या महायुतीत आहेत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत पण पृथ्वीराज जाचक कोण ? पृथ्वीराज जाचकांना विचारा की तुमचा पक्ष कोणता आहे. तुम्ही सर्वपक्षीय बैठक घेता तसं नाव देता मग तुम्हाला तर माहित आहे का की तुमचा स्वतःचा पक्ष कोणता आहे. सभासदांच्या अन्नात माती कालवण्याचे काम तुम्हीच करता आणि पुन्हा हे गोंडस नाव तुम्हीच देता. की मला सभासदांचे हित बघायचे आहे. कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी यांनी केलेली ही ढोंग आहेत. असा आरोपी थोरात यांनी जाचक यांच्यावरती केला.
What's Your Reaction?






