औरंजेबाचा स्टेट्स ठेवणं तरुणास भोवलं ! इंदापूर पोलिसात दाखल झाला गुन्हा, तरुणास पोलिसांकडून अटक

आय मिरर
पुण्याच्या इंदापूर मध्ये मुस्लिम तरुणाने आपल्या मोबाईल वर औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्याने सकल हिंदू समाज आक्रमक झाल्याच पाहायला मिळालं. इंदापूर पोलीस ठाण्यात हिंदू समाज बांधवांनी ठिय्या मांडत स्टेटस ठेवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची मागणी केली. इंदापूर पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेचे पुणे विभागाचे सहमंत्री आणि इंदापूर भाजपचे शहराध्यक्ष किरण गानबोटे यांच्या तक्रारीवरून अक्रम रशीद कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतल्याची माहिती इंदापूरचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिली आहे.
कोणीही कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी केले असून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशाराही कोकणे यांनी दिला आहे.
दरम्यान या मुद्द्यावरून आक्रमक होत सोमवारी रात्री उशिरा मोठ्या संख्येने सकल हिंदू समाज इंदापूर पोलीस ठाण्यामध्ये एकवटला. या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली.
किरण गानबोटे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मोबाईल मध्ये अक्रम रशीद कुरेशी याचा मोबाईल नंबर सेव्ह केलेला आहे. किरण गानबोटे हे व्हाट्सअप वापरतात. आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास गानबोटे हे त्यांच्या मोबाईल वरती स्टेटस पाहत होते. यावेळी आक्रम कुरेशी यांनी ठेवलेला स्टेटस गानबोटे यांना दिसला. दिनांक २ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तो ठेवला होता.
या स्टेटस मध्ये औरंगजेब याचा फोटो आणि त्याखाली 03 मार्च WAFTE हजरत औरंगजेब आलमगीर आर ए असं लिहिलेला स्टेटस ठेवला होता. यामुळे संबंध हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारत देशात औरंगजेबाचे कोणतेही चांगले कार्य नसताना औरंगजेबाचे उद्यातीकरण व्हावे या उद्देशाने आणि हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण होऊन सार्वजनिक शांतता बिघडण्याच्या हेतूनेच हा स्टेटस कुरेशी यांनी त्यांच्या व्हाट्सअप ला ठेवला आहे अशी तक्रार गानबोटे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.
What's Your Reaction?






