मोठी बातमी || बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद,वडगांव निंबाळकर पोलीसांत अनेकांवर दाखल झाला गुन्हा
आय मिरर
बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीनंतर दोन गटात वाद झाल्याने 80 ते 90 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. निवडणूक निकाला दिवशी पुणे जिल्हाधिकारी यांनी जमाव बंदी, शस्त्रबंदिचा आदेश काढले होते. परंतु सदर अदेशास न जुमानता सार्वजनीक ठिकाणी बेकायदेशिररित्या गर्दी जमाव जमवुन आरडा ओरडा, मारामारी, दंगा करुन शांतता भंग केला आहे. तसेच खाजगी गाड्यांच्या काचा फोडुन नुकसान केल्याने पोलिसांनी स्वतः गुन्हा नोंद केला आहे. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
वडगाव निंबाळकर पोलिसांनी 143,147,148,149,160, 188 ,324,323,427, सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1991 चे कलम 37(1)/135 प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपी दुर्योधन भापकर याच्यावर सायंबाचीवाडी येथील पोलीस पाटील यांनी देखील गुन्हा नोंद केला आहे.. दुर्योधन भापकर याने जाणीवपूर्वक पोलीस पाटील यांना मारहाण केल्याचा पोलीस पाटलांचा आरोप आहे..
What's Your Reaction?