पुढील पाच वर्ष श्री छत्रपती कारखान्याचं नेतृत्व पृथ्वीराज जाचकांनी करावं - उपमुख्यमंत्री अजित पवार

Apr 7, 2025 - 07:31
 0  2064
पुढील पाच वर्ष श्री छत्रपती कारखान्याचं नेतृत्व पृथ्वीराज जाचकांनी करावं - उपमुख्यमंत्री अजित पवार

आय मिरर 

पुढील पाच वर्षे पृथ्वीराज जाचक यांनी छत्रपती साखर कारखान्याचे नेतृत्व करावे असं मी ठरवले आहे. असं म्हणणं अजित पवारांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा अध्यक्ष पदाचा चेहरा कोण हे जाहीर केलं आहे. तुम्ही मला सहकार्य करा अडचणीत आलेला छत्रपती साखर कारखाना बाहेर काढू त्यासाठी साथ द्या असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीत केले आहे.

इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे.या संदर्भात रविवार दि.06 एप्रिल रोजी भवानीनगर येथे सर्व पक्ष शेतकरी कृती समितीचे आढावा बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याच्या क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक उपस्थित होते.यावेळी अजित पवार बोलत होते. एवढी कारखानाचे उपाध्यक्ष शेतकरी सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अजित पवार म्हणाले की,महाराष्ट्रात राम राज्य याव अशी अपेक्षा व्यक्त करतो.1984 साली मी छत्रपती वर मी पहिल्यांदा निवडून आलो.राज्यात पहिला सह साखर कारखाना प्रवरानगर ला उभा राहिला.छत्रपती साखर कारखान्याचा आणि माझा संबंध 41 वर्षापासून चा आहे.41 वर्षापूर्वी मला इथल्या लोकांनी निवडून दिले.

छत्रपती कारखान्याच्या निवडणुका नेहमी चुरशीच्या होत होत्या.तो काळ वेगळा होता आताचा काळ वेगळा आहे..साखर कारखानदारी अतिशय अडचणीतून चालली आहे. माळेगांव, सोमेश्वर,कागल चा कारखाना,भीमा शंकर हे चांगले चालले चालणारे कारखाने आहेत.सर्वांचा प्रपंच साखर कारखान्यावर अवलंबून आहे.आर्थिक नाडी ज्याच्याशी जोडली आहे अशा संस्थात योग्य मॅनेजमेंट झाली नाही तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते नेमकं ते या दहा वर्षात घडलं आहे.

राज्यात यंदा खूप कमी ऊस होता,साखर कारखाने कमी काळ चालले.याचा फटका सर्वांनाच बसला आहे.राज्य सरकारने इथेनॉल निर्मिती ला वाव दिला आहे दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्र अध्यक्ष ट्रम्प यांनी कसे कर लावले आहेत पहा.मात्र अद्याप पर्यंत छत्रपती साखर कारखान्याने डिस्टलरी केली नाही.माझ्याकडे उत्पादन शुल्क खाते आहे. राज्य सरकार पाच वर्षासाठी स्थिर आहे 238 आमदार महायुतीचे आहेत.त्यामुळे या संदर्भातील अडचणी आपण सोडवू शकतो.

सलाईन काढले की संपलं.....

केंद्रात भाजपा सरकार आहे.केंद्रीय मंत्री अमित शहांनी साखर कारखान्यांचा गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा इन्कमटॅक्स काढून टाकला.यासाठी अनेक जण प्रयत्न करीत होते पण कोणाला ते जमले नाही.याचा 10 हजार शेतकऱ्यांचा फायदा झाला.काही साखर कारखाने निवडणुका जवळ आले की लोन काढून भाव देतात. यातून अनेक कारखाने डबघाईला आले आहेत.काही कारखाने आचके देत आहेत, सलाईन लावले आहे. सलाईन काढले की संपलं.आज ती अवस्था छत्रपती साखर कारखान्याची झाली आहे. 

मी बोर्डात असतो तर सुता सारखं सरळ केलं असतं.नोकर भरती करू म्हणाले नोकर भरतीच तर वजवाटोळे झालं. असं म्हणत अजित पवारांनी तत्कालीन संचालक मंडळावर तीव्र नाराजी व्यक्त केली.विलासराव देशमुख यांच्या काळात खाजगी साखर कारखाना काढायची परवानगी मिळाली.राज्यातील 200 सहकारी साखर कारखान्यांपैकी 100 कारखाने खाजगी झाले. तर उरलेले 100 अडचणीत आहेत.अशी अवस्था झाली आहे. आज आपला श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना 173 कोटी रुपये तोट्यात आहे.

कारखान्याचे खात बंद करणार होते.....

युनियन बँकेचे पैसे भरले नाहीत तर आपल्या कारखान्याचे खात बंद करणार होते.त्याच वेळी कारखाना बंद झाला असता. यंदा 5 लाख 90 हजार गाळप झाले असून ते खूप कमी आहे. तालुक्यातील इतर खाजगी कारखाने खूप पुढे आहेत. तालुक्यातील खाजगी कारखान्याचा 24000 मेट्रिक टन पर डे गाळप घास झाला आहे.तर शेजारी नेत्यांच्या ताब्यात असलेला साखर कारखाना जर दुसऱ्या कोणाला चालवायला दिला हे ऐकायला आले तर आश्चर्य वाटू देऊ नका. असा टोलाही दादांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांना लगावला.

आम्ही काय झक मारली काय मग.....

10 वर्षे निवडणूक लांबली, या पठ्ठ्यांना 10 वर्षे सत्ता मिळाली.कुठलं नशीब घेऊन जन्माला आली होती कोणाला माहीत,तुम्हाला 10 वर्ष मिळाली आता बास,आता समाधान माना अशा शब्दात त्यांनी विद्यमान संचालकांना थांबण्याचा सल्ला दिला.काही जण इथे येऊन सही करून निवांत फिरत असतात,काहींचे ट्रॅक्टर आहेत.पांघरूण घेऊन इथे येतंय अरे डायरेक्टर आहे ट्रॅक्टर सोड...आरे आम्ही काय झक मारली काय मग असं म्हणत काही संचालकांच्या कामकाजावर त्यांनी नाराजी ही व्यक्त केली.

कधी कधी मनात येत होत राजीनामा घ्यावा आणि आपणच चेअरमन व्हावं.काही काहींनी तर टॉवर उभा करताना लिहून घेतले की मी रिटायर झाल्यावर माझ्या पोराला नोकरीला घ्या. बाकीच्यांनी काय चुना लावायचा का ? छत्रपती बजार काढला त्यात काही संचालक वेलदोडे खिशात घालत होते.बदाम खिशात घालत होते. कशी संस्था चालेल.आपल्या शाळेच इंग्लिश मीडियम आहे पण त्या शाळेत शिकलेल्यांना इंग्लिश येत नाही.

आज खूप बदल करावे लागतील,काय काय जण भूषावर पाठवावे लागतील.इथला पेट्रोल पंप पहिला तर दळभद्री.साधा त्यावर पत्रा देखील नाही काय अवस्था करून ठेवलीय. शॉपिंग सेंटर ची मालकी कारखान्याची पैसे दुसरेच कमवत आहेत. हे करण्यासाठी इचशक्ती लागते. 

माळेगांव कारखान्याचा भाव माझ्या मते 3500 पर्यंत जाईल.इथे छत्रपती कारखान्याला मात्र 2800 रुपये दर मिळतो.गेले अनेक दिवस मी पृथ्वीराज बापूंना सांगायचे हे दुरुस्त करायचं. परंतु बापू दुसऱ्या मोठ्या नेत्यांना भेटले की गाडी बिघडायची.आम्ही घोलप साहेबांना मनापासून साथ दिली आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.पृथ्वीराज बापू कारखान्यात मीटिंग ला जायचे पण काय केलं काय माहित नाही ते मीटिंगला जायला नकोच म्हणाले. 

आजचा मेळावा सर्व पक्षीय आहे सर्वपक्षीयात अजित पवार येतो म्हणून मी आलो.मागे ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त कराव्या लागतील.ज्यांचे ट्रॅक्टर कारखान्याला आहेत त्यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी भरू नका.स्वच्छ कारभार करणारं बोर्ड असायला हवं.आज घरचा गडी ऐकत नाही, पोर ऐकत नाहीत. लागण तारखे प्रमाणे ऊस तोडले जात नाहीत, डायरेक्ट चा खोडवा आणि बाकीच्यांची लागण तशीच राहते.

इथे संचालक आहे मात्र बाहेर ऊस घालता. ज्याने हे केले त्याला जनाची नाही मनाची तरी थोडी वाटली पाहिजे.इथून पुढे आपल्याला हार्वेस्टर वर जावे लागेल.त्या दृष्टीने पावले टाकावी लागतील. उद्याच्या निवडणुकीत कप बशी हे चिन्ह घ्या.कप बशी ही जरा ओळखीची असते प्रचाराला सोपी जाते.अनेक लोकांकडे कारखाने आहेत,तरीपण आमदारकीला आणि खासदारकीला निवडून येत नाहीत.आपण पॅनल टाकल्यावर आपला पॅनल निवडून येणार.आता बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे किंवा एकतर्फी होईल.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow