डोक्यावर छातीवर पाठीवर वार वरून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जळण्याचा प्रयत्न, दौंडच्या भुलेश्वर घाटात...

Jul 4, 2025 - 20:23
Jul 4, 2025 - 20:23
 0  3263
डोक्यावर छातीवर पाठीवर वार वरून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जळण्याचा प्रयत्न, दौंडच्या भुलेश्वर घाटात...

आय मिरर 

दौंड तालुक्याच्या भुलेश्वर घाटात अर्धवट जळलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. २७ जून रोजी यवत पोलीस स्टेशन हद्दीत भुलेश्वर घाट परिसरात हा मृतदेह आढळून आला आहे. या मृत इसमाच्या डोक्यावर, छातीवर व पाठीवर धारदार आणि तीव्र हत्याराने वार झाल्याचे यवत पोलिसांनी सांगितले आहे.

अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचा पुरुषाचा हा मृतदेह असून यवत-भुलेश्वर रोडपासून सुमारे १०० मीटर अंतरावर, शेरू रिसॉर्टकडे जाणार-या कच्च्या रस्त्याजवळ हा मृतदेह आढळून आला, याची माहिती मिळताच यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने आणि पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरच्या मृत व्यक्तीच्या डोक्यावर छातीवर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत याशिवाय हा मृतदेह पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून यवत पोलीस अधिक तपास करत आहेत.

या मयत पुरुषाचे वय ३० ते ३५ असंतो अंगाने सडपातळ आहे. चेहरा उभट असून डोक्याचे केस काळे, उंची ०५ फुट ०५ इंच आहे. अर्धवट जळालेल्या मयताचे अंगावर जळालेल्या अवस्थेत लाल, पांढ-या रंगाचा चौखडा शर्ट, पायामध्ये तपकीरी रंगाचा लेदरचा सेंडल त्याचे समोरील बाजुस नक्षीकाम केलेले असुन खालील बाजुचे सोल काळे रंगाचे आहे.

याबाबत यवत पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार विनायक हाके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा तपास यवत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow