एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन

Dec 26, 2024 - 19:37
 0  226
एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट भिगवन व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन

आय मिरर

पळसदेव (ता. इंदापूर)येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी.बनसुडे विद्यालयामध्ये रोटरी स्कुल पेंट प्रोजेक्ट व जी डी बी & कोटिंगचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.

याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमास जी डी बी पेंट अँड कोटिंग चे प्रोग्रॅम मॅनेजर अतुल कुलकर्णी यांनी उपस्थिती दर्शवत कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ही भूषविले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ भिगवणचे अध्यक्ष संतोष सवाने,सेक्रेटरी संजय रायसोनी,खजिनदार कुलदीप ननवरे, रियाजभाई शेख, संजय खाडे , एलजी बनसुडे स्कूलचे उपाध्यक्ष शितल कुमार शहा,नंदा बनसुडे,सचिव नितीन बनसुडे, सदस्य अंकुश बनसुडे, हनुमंत मोरे ,अर्चना बनसुडे,अशोक बनसुडे, सुनील काळेल, प्राचार्या वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना संतोष सवानी आणि रियाज शेख यांनी रोटरी क्लब देत असलेल्या योगदानाबद्दल माहिती देत असताना त्यातील एल जी बनसुडे संस्था ही आमच्या दृष्टीने मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला असल्याचे सांगितले, तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे यांनी रोटरी क्लब भिगवन तसेच जी डी बी पेंट अँड कोटिंग कंपनीने केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश दरदरे यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow