भवानीनगरच्या श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून पृथ्वीराज जाचकांचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास पत्र ; वाचा काय आहे पत्रात

Mar 30, 2025 - 06:53
Mar 30, 2025 - 07:51
 0  1640
भवानीनगरच्या श्री छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून पृथ्वीराज जाचकांचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास पत्र ; वाचा काय आहे पत्रात

आय मिरर

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालवल्या जात असलेल्या इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अगदी कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी राज्य सहकारी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांना एक पत्र पाठवल आहे. या पत्राद्वारे त्यांनी कारखान्याची निवडणूक अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्याची विनंती केली आहे.तर काही गोष्टी देखील आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.

काय लिहिलंय पत्रात...

मी श्री छत्रपती स.सा.का.लि.भवानीनगर, ता. इंदापूर, जि. पुणे चा ऊस उत्पादक सभासद असून सदर कारखान्याच्या मतदार यादीसंदर्भात मा. उच्चन्यायालयामध्ये वेळोवेळी चार याचिका दाखल केल्या आहेत हे आंपणास ज्ञात आहे. सदर याचिकेचा नुकताच निर्णय लागून लवकरच कारखान्याचा निवडणूक प्रोग्रॅम लागणार आहे समजते. सदर निवडणूकीचा प्रोग्रॅम जाहीर करताना मला याचिकाकर्ता म्हणून ई-मेलद्वारे व पत्राद्वारे त्वरीत अवगत करावे ही विनंती.

श्री छत्रपती स.सा.का.लि. भवानीनगर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आलेला आहे. सदर मतदार यादी करत असताना हेतूपुरस्सर संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व मा.प्रादेशिक सहसंचालक (साखर) सो यांनी हेतुपुरस्सर व तत्कालिन सहकार कायदा व पोटनियम यास बगल देऊन मतदार यादी तयार केली होती याची कृपया नोंद घ्यावी व मा.प्रादेशिक सहसंचालक (साखर) सो यांचेबाबत आपल्या कार्यालयाकडे व राज्यशासनाकडे लेखी तक्रार केलेली आहे याची माहिती घ्यावी. 

कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक व मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) सो व निवडणूकीसंबंधीत अधिकारी हे पुणे जिल्ह्यातील राजकीय दबावापोटी अजूनही बेकायदेशिर कृती करण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यासाठी श्री छत्रपती स.सा.का.कि.भवानीनगर कारखाना भवानीनगरची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी वेगळी यंत्रणा राबविण्यात यावी तसेच प्रत्येक मतदार केंद्रावर व मतपेट्या ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील ते ठिकाण अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेऊन सुरक्षीत कराव्यात. 

पाच वर्षापुर्वी बारामती तालूक्यातील एका सहकारी कारखान्याच्या निवडणूकीमध्ये गैरप्रकार घडले आहेत याची माहिती घ्यावी ही विनंती. श्री छत्रपती स.सा.का.का लि. भवानीनगरची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पार पाडण्यात यावी व यामध्ये काही कायदेशिर बाबी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास निवडणूक आयुक्त म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार रहाल....

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow