इंदापुरात CM फडणवीसांनी जपली 35 वर्षाची मैत्री ! नगरसेवक असल्यापासून फडणवीस दर्शनाला आल्यावर घेतात राऊतांचा चहा

Mar 30, 2025 - 07:59
Mar 30, 2025 - 08:01
 0  1345
इंदापुरात CM फडणवीसांनी जपली 35 वर्षाची मैत्री ! नगरसेवक असल्यापासून फडणवीस दर्शनाला आल्यावर घेतात राऊतांचा चहा

आय मिरर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दि. 29 मार्च रोजी इंदापूर तालुक्यातील श्री लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेतले आणि हे दर्शन घेतल्यानंतर नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस दशरथ राऊत यांचा आवडता चहा घ्यायला काही विसरले नाहीत.

इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपुर येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर हे फडणवीसांचं कुलदैवत आहे. त्यांनी आज या ठिकाणी आपल्या कुलदैवताचं दर्शन घेतलं.लक्ष्मी नृसिंहाला अभिषेक देखील केला.

यानंतर गावकऱ्यांशी चर्चा करून फडणवीस मंदिराच्या बाहेर पडले.घाई गडबड असताना देखील फडणवीसांनी आपली पावलं दशरथ राऊत यांच्या टपरीकडे वळवली आणि फडणवीसांच्या आवडीचा असणारा राऊत यांच्या चहाचा आस्वाद फडणवीसांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मंत्रिमंडळातील काही इतर सहकारी मंत्री आणि प्रमुख पदाधिकारी हे देखील उपस्थित होते.

राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेली 35 ते 40 वर्षाची मैत्री आहे. ज्या ज्या वेळी फडणवीस या ठिकाणी दर्शनाला येतात त्यावेळी ते माझ्याकडे चहा घ्यायला येतात. मी म्हणतो साहेब चहा घेणार का आणि ते म्हणतात तुझा चहा पिल्याशिवाय मी जाणार नाही.अशी प्रतिक्रिया यावेळी दशरथ राऊत यांनी दिली आहे.

फडणवीस यांनी राजकारणात एन्ट्री केली आणि नगरसेवक झाले. तेव्हापासून लक्ष्मी नृसिंहाला आले की फडणवीस हे दशरथ राऊत यांच्या हॉटेलवर जातात आणि मनमुराद चहाचा आस्वाद घेतात. राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर देखील फडणवीस यांनी हे मैत्रीचं नातं अतूट जपल आहे.आज देखील तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतरही आणि राज्याचा प्रमुख असल्यानंतरही राऊतांच्या टपरीवर जाण्याचा आणि चहाचा आस्वाद घेण्याचा नियम काही त्यांनी मोडला नाही.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow