भिगवण सायकल क्लबच्या अध्यक्षपदी अल्ताफ शेख व सचिवपदी संदीप ताटे
आय मिरर : भिगवण (नारायण मोरे )
भिगवण सायकल क्लबच्या अध्यक्षपदी अल्ताफ शेख व सचिवपदी संदीप ताटे यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष केशव भापकर यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर ही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी योगेश चव्हाण व खजिनदारपदी प्रविण वाघ यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकारी यांचा सत्कार महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
सात वर्षांपूर्वी बारामती सायकल क्लबचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या सायकल क्लबची स्थापना करण्यात आली. भिगवण सायकल क्लबने स्वतःच्या आरोग्याबरोबर, गावोगावी जाऊन वृक्षरोपणाचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे. भिगवण सायकल क्लबचे जवळपास ४० ते ५० सदस्य असून, यांच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या राईड केल्या जातात. यामध्ये महिलांचे प्रमाण देखील लक्षणीय आहे.
नूतन अध्यक्ष अल्ताफ शेख यांनी सांगितले की, भिगवण सायकल क्लबच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये वृक्ष लागवड करण्यात येणार असून, भिगवण मध्ये सायकल स्वारांच्या संख्येत वाढ व्हावी तसेच, सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
यावेळी माजी अध्यक्ष संपत बंडगर, रणजीत भोंगळे व केशव भापकर यांनी सात वर्ष सायकल क्लबची धुरा सांभाळली याबद्दल त्यांचे सायकल क्लबच्या वतीने आभार मानण्यात आले. या कार्यक्रमाला सायकल क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
What's Your Reaction?