शिक्षक दिनी इंदापूरात 177 शिक्षक सामूहिक रजेवर

Sep 5, 2023 - 16:44
 0  853
शिक्षक दिनी इंदापूरात 177 शिक्षक सामूहिक रजेवर

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील 177 शिक्षक आज शिक्षक दिनी सामुहिक रजेवर गेलेत. या संदर्भातील माहिती इंदापूर पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांनी दिली आहे.शिक्षकांना अद्यापना व्यतिरिक्त लावली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करावीत या मागणीसाठी शिक्षकांनी एकदिवसीय सामुहिक रजेचे हत्यार उपसलयं.तर जे शिक्षक सेवेवर आहेत त्यांनी देखील काळ्या फिती लावून सरकारी धोरणाचा निषेध नोंदवलाय… या संदर्भातील लेखी निवेदन इंदापूर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांना देण्यात आले आहे.

इंदापूर पंचायत समिती अंतर्गत इंदापूर तालुक्यात ३७७ जिल्हा परिषद शाळामध्ये एकूण ९८६ शिक्षक अद्यापनाचे काम करतात.आम्हाला विद्यार्थ्यांना शिकवू द्या ही प्रमुख मागणी शिक्षकांची आहे.मात्र या शिक्षकांना आँनलाईन माहिती भरणे,विविध अँप्स वर कामकाज करणे याव्यतिरिक्त बी.एल.ओ.ची कामे करावी लागतात जी अद्यापनाच्या बाहेर आहेत. याला त्रस्त होऊन या शिक्षकांनी राज्यभर शिक्षक दिनी एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन छेडले आहे.

शाळा विद्यार्थी व शिक्षकांच्या मागण्यांची सोडवणूक होण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती म्हणून आम्ही सातत्याने शासनाकडे अर्ज व निवेदने देत आहोत मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून सनदशीर सत्याग्रह केला आहे तरीही कोणतीच दखल घेतली जात नसल्याने गोरगरीब बहुजन वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षकाच्या आत्मसामानासाठी वेगळी भूमिका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय दिसत नाही म्हणून आमचा तोंड देखता गौरव न करता खऱ्या अर्थाने आम्हाला समजून घेऊन न्याय मिळावा यासाठी आम्ही आज शिक्षक दिन 5 सप्टेंबर 2023 रोजी एक दिवसाच्या पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सुनील वाघ यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow