जरांगेंच्या लढ्याला यश ! साखळी उपोषणाने तालुक्याचे लक्ष वेधलेल्या कांदलगावात गुलालाची उधळण

Jan 28, 2024 - 07:52
Jan 28, 2024 - 08:29
 0  501
जरांगेंच्या लढ्याला यश ! साखळी उपोषणाने तालुक्याचे लक्ष वेधलेल्या कांदलगावात गुलालाची उधळण

आय मिरर(देवा राखुंडे)

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणा संदर्भातील सर्व मागण्या राज्य सरकारने मंजूर करून अध्यादेश काढल्यानंतर संपूर्ण राज्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला जात आहे .मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी राज्यातून अनेक मराठा समाज बांधव हे मुंबईला रवाना झाले होते.इंदापूर तालुक्याच्या कांदलगाव मधून देखील काही तरुण मुंबईत दाखल झाले होते. मराठ्यांच्या लढ्याला यश प्राप्त होतात मातृभूमीत परतलेल्या या मराठा योद्धांचं इंदापूरच्या कांदलगांवात शनिवारी दि.२७ जानेवारी रोजी रात्री गुलालाची उधळण करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची देशानं नव्हे तर जगानं दखल घेतली. याच दरम्यान जरांगे पाटलांच्या लढ्याला बळ देण्यासाठी महाराष्ट्रात गावोगावी साखळी उपोषणे आमरण उपोषणे झाली. यावेळी इंदापूरच्या कांदलगाव मध्ये देखील सौदागर ननवरे आणि बंडू ननवरे या दोन मराठा योद्धांनी जीवावर उद्धार होत आमरण उपोषण केले. यासोबतच शंभर दिवसाहून अधिक दिवस कांदलगाव मध्ये साखळी उपोषण करण्यात आले आणि यामुळेच कांदलगाव ने तालुक्याचे लक्ष वेधून घेतलं.

शंभर दिवसाहून अधिक काळ साखळी उपोषण करीत असताना नित्य क्रमाने सकाळी आठ वाजताच्या सुमारास गावातील उपोषण स्थळी मुख्य चौकात छत्रपती शिवरायांची आरती करण्यात येत होती. या साखळी उपोषणाच्या कालावधीत साखळी उपोषण स्थळी अनेक कीर्तनकार यांची कीर्तने समाज प्रबोधनकारांची व्याख्याने आयोजित करून समाजात मराठा आरक्षणाविषयी प्रबोधनावरती भर देण्यात आला.याच दरम्यान गावातून भव्य मशाल मोर्चा देखील काढण्यात आला होता.या सर्व प्रक्रियेमध्ये गावातील तरुण मुले युवक अबालवृद्ध यांसह जेष्ठ नागरिक पुरुष आणि महिला वर्गाने ही या साखळी उपोषणाच्या लढ्यात सहभाग नोंदवत या आंदोलनकर्त्यांना दोन हत्तीचे बळ दिले.

आरक्षणाच्या अंतिम टप्प्यात जेव्हा मुंबई वरती चाल करण्याची वेळ आली तेव्हाही हे मराठा तरुण मागे हटले नाहीत. बंडू ननवरे आणि सौदागर ननवरे यांनी पुढाकार घेत आपल्या इतर सवंगड्यांच्या मदतीने 24 जानेवारी रोजी जरांगे पाटलांना समर्थन दर्शवण्यासाठी मुंबईकडे चाल केली. अखेर कोट्यावधींच्या मराठ्यांपुढे सरकार झुकले आणि मराठ्यांच्या लढ्याना अर्थात जरांगे पाटलांच्या लढ्याला यश आलं.

जेव्हा 27 जानेवारी रोजी सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे घोषित केले,तसा अधिकृत शासन निर्णय जरांगे पाटलांच्या हाती सोपवला तेव्हा महाराष्ट्रात अक्षरशा दिवाळी साजरी झाली. त्यानंतर कांदलगावची ही मंडळी देखील आपल्या मातृभूमीत परतली तेव्हा कांदरगावकरांनी त्यांच्या स्वागतासाठी येशीवरच ठिय्या मांडला होता.

सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये छत्रपती शिवरायांची मूर्ती मांडून आनंदमय आणि उत्साही वातावरणात फटाक्यांच्या अतिशबाजीत गुलालाची उधळण करीत अवघ्या गावाला वळसा घालण्यात आला.यावेळी हाती भगवा ध्वज घेऊन डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई अक्षरशा जल्लोषात न्हाऊन निघाली होती. या आनंदोत्सवात शहा- महादेवनगर,तरडगाव, हिंगणगाव यासह इतर पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने समाज एकवटला होता. याच मिरवणुकी दरम्यान जागोजागी गावातील महिला या मराठा योद्धांची अक्षरशा आरती करत होत्या.कित्येक वर्षानंतरचा मराठ्यांचा लढा या ऐतिहासिक आंदोलनामुळे पूर्ण झाल्याचा उसाडून वाहणारा आनंद अगदी सर्वांचा चेहऱ्यावरती पाहायला मिळत होता.

गावच्या वेशीपासून सुरू झालेली मिरवणूक जेव्हा संपूर्ण गावातून साखळी उपोषण स्थळी मुख्य चौकात आली तेव्हा मराठ्यांचा लढा कसा राहिला ? संघर्ष कसा करावा लागला ? मुंबईची वारी कशी राहिली आणि आम्ही तिथे काय अनुभवलं ? या लढ्याची का गरज होती? याबद्दल बंडू ननवरे,सौदागर ननवरे आणि गणेश बाबर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून या मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी राहुल काशीद यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow