इंदापूरात नराधमाने अल्पवयीन मुलीस पाजले विष,भाजपाच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरे आक्रमक

Jul 31, 2024 - 18:54
 0  950
इंदापूरात नराधमाने अल्पवयीन मुलीस पाजले विष,भाजपाच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरे आक्रमक

आय मिरर

इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती येथे 9 वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेतील नराधम क्लार्कने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने विरोध दर्शवल्याने या नराधमाने तला विष पाजलं होतं. आज उपचारादरम्यान या मुलीचा मृत्यू झाल्याने भाजपच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट इंदापूर पोलीस स्टेशन गाठत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

अंकिता पाटील ठाकरे म्हणाल्या की, आरोपीने तिला विषारी औषध दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत या मुलीचे दुःखद निधन झाले. यामुळे तालुक्यातून संताप व्यक्त केला जात आहे.

मी आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.ही एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर त्या खूपच भयानक असून या घटना थांबल्या पाहिजेत. या घटनेमुळे इंदापूर तालुक्यात मुली, महिला सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे या प्रकरणात लक्ष घालून याबाबत पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत आरोपीला कठोर शिक्षा करावी अशी आमची मागणी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow