भिगवण-राशीन महामार्गावर तक्रारवाडीजवळ गतिरोधक बसविण्याची मागणी
आय मिरर भिगवण : (नारायण मोरे )
भिगवण-राशीन रस्त्यांवर अपघाताची शक्यता वाढली आहे. या ठिकाणी तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी केली जात आहे. परिसरातील मोठी बाजारपेठ भिगवण येथे असल्याने नेहमी रस्त्यांवरून नागरिकांची वर्दळ असते. सध्या वाहनांची संख्याही वाढली आहे. अशातच नव्याने अद्ययावत अशा सिमेंट रस्त्यामुळे दुतर्फा वेगाने धावणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली.भिगवण-राशीन महामार्गावर तक्रारवाडी गावानजीक वाहनांची मोठी वर्दळ असते.
या रस्त्यावरून तक्रारवाडी येथील नावाजलेल्या जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी आसपासच्या गावांमधून येणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात आहे.तसेच भिगवण मुख्य बाजारपेठेत जाण्यासाठी, महाराष्ट्रातील सर्वात मोठा गोड्या पाण्याचा माशाचा बाजारही इंदापूर कृषी उत्पन्न बाजार उपसमिती भिगवण याठिकाणी भरतो त्यामुळे सकाळी सकाळी मोठ्या प्रमाणात मासे विक्री-खरेदी करण्यासाठी आलेल्या लहान मोठ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना व त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या पालकांची मोठ्या प्रमाणात रस्ता ओलांडताना तारांबळ उडत आहे.
रस्ता ओलांडण्यासाठी ठिकठिकाणी दुभाजकामध्ये छोटे छोटे जोड दिल्यामुळे अचानक वाहने वळत असल्यामुळे छोटे-मोठे अपघात रोज या ठिकाणी घडत आहेत. रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवालाही त्यामुळे धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर तक्रारवाडी येथे बारामती जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची बस स्थानकावर ती गर्दी असते या बेशिस्त वाहनांमुळे एसटी वळवण्यासाठी अडचण निर्माण होत असल्यामुळे एसटी चालकांचीही मोठ्या प्रमाणात कसरत होताना पाहायला मिळत आहे.
रस्त्याच्या मधोमध दुभाजक बसविण्यासाठी जागा सोडलेली असल्यामुळे वाहनचालकांना रात्रीचा त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडलेले आहे रस्त्याच्या मधोमध दुभाजकासाठी सोडलेल्या जागा दाखविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फलक लावले नसून वाहन चालकांना याचा रात्री अंदाज येत नाहीत त्यामुळे जागोजागी अशा प्रकारचे फलक लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भिगवन ही एक मोठी बाजारपेठ असून भिगवण शहरांमध्ये जाण्यासाठी तक्रारवाडी गावापासून मुख्य रस्ता जातो . हा मुख्य रस्ता भिगवन राशीन रस्त्याला जोडला असल्यामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ आहे. भिगवण बारामती,तक्रारवाडी या ठिकाणच्या शाळांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना भिगवन राशीन रस्ता ओलांडून जावे लागते. तसेच नवीन सिमेंटच्या असल्यामुळे वाहनांचा वेग ही वाढल्यामुळे एखादा मोठा अपघात होऊन नाहक कोणाचा तरी बळी जाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी वेळेतच महामार्ग प्रशासनाने दुभाजक बसवावे. - शरद वाघ ग्रामपंचायत सदस्य तक्रारवाडी
What's Your Reaction?