भिगवण मध्ये एस टी चालक वाहकांसह प्रवाशांची मोफत आरोग्य तपासणी

Sep 11, 2023 - 17:09
Sep 11, 2023 - 17:17
 0  934
भिगवण मध्ये एस टी चालक वाहकांसह प्रवाशांची मोफत आरोग्य तपासणी

आय मिरर ( विजयकुमार गायकवाड )

रोटरी क्लब ऑफ भिगवण, ग्रामीण रुग्णालय भिगवण व वाहतूक नियंत्रक परिवहन महामंडळ भिगवण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार 11 सप्टेंबर रोजी एस.टी.बस चालक व वाहक तसेच उपस्थित प्रवाशांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

या शिबिरामध्ये शुगर तपासणी ,ब्लड प्रेशर या तपासण्या व आहार विषयी मार्गदर्शन करण्यात आले सकाळी 10 ते 2 या वेळेमध्ये साधारण 78 लोकांची तपासणी करण्यात आली.

यावेळी प्रामुख्याने भिगवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन विभुते वैद्यकीय अधिकारी डॉ विनायक देशपांडे डॉ अमोल खानावरे तसेच अधिपरीचारिका रेश्मा निळे प्रियदर्शनी शिंदे जया गायकवाड लॅब टेक्निशन शिवांजली वाकळे यांनी तपासणी केल्या. यावेळी भिगवण ग्रामपंचायतचे पदाधिकाऱ्यांनी यांनी शिबिराला भेट दिली तसेच इंदापूर बस आगार चे डेपो मॅनेजर गोसावी यांनीही भेट दिली.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रणजीत भोंगळे यांनी सर्वांचे आभार मानले व आज दैनंदिन जीवनामध्ये एस.टी. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने बस चालक व वाहक यांच्यावरील ताण वाढत आहे हे लक्षात घेता त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याचे सांगितले कार्यक्रमाचे नियोजन रोटरी क्लबचे सर्व सदस्य व भिगवण बस स्थानकाचे वाहतूक नियंत्रक एन.एम.राऊत यांनी केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow