इंदापूर क्रेडाई संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट जालिंदर बसळे 

Apr 21, 2025 - 14:17
Apr 21, 2025 - 14:27
 0  97
इंदापूर क्रेडाई संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट जालिंदर बसळे 

आय मिरर 

इंदापूर क्रेडाई संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट जालिंदर बसळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. इंदापूर येथे कार्यकारणीची नुकतीच एक बैठक पार पडली.या बैठकीत 2025 ते 2027 करिता ॲडव्होकेट जालिंदर बसळे यांची अध्यक्ष म्हणून तर सचिव पदी बाळासाहेब मेहत्रे आणि खजिनदार म्हणून मुख्तार पठाण यांची निवड करण्यात आली. 

यावेळी इंदापूर क्रेडाईचे संस्थापक अध्यक्ष वसंतराव माळुंजकर, संस्थापक उपाध्यक्ष गोपीनाथ मोरे,ज्येष्ठ संचालक विशाल बोंद्रे,ज्येष्ठ संचालक दयानंद व्यवहारे,मावळते अध्यक्ष संजय भोंग,सेक्रेटरी बाळासाहेब मेहत्रे,खजिनदार सोमनाथ गवळी माजी अध्यक्ष कैलास नरुटे आदी उपस्थित होते.

निवडीनंतर इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव मुकुंद शहा,  जे.के.शिंदे,इंदापूर तालुका शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट तेजसिंह पाटील, ॲडव्होकेट रणजीत चौधरी आदींनी बसळे यांचे अभिनंदन केले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow