मोठी बातमी | उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले,भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग

Aug 4, 2024 - 18:10
 0  1681
मोठी बातमी | उजनी धरणाचे 16 दरवाजे 40 सेंटीमीटरने उघडले,भीमा पात्रात 21 हजार क्युसेकने विसर्ग

आय मिरर

उजनी धरण सध्या 89 पूर्णांक 80 टक्के इतकं भरलं असल्याने उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सायंकाळी 5 पाच वाजल्यापासून 21 हजार 600 क्युसेक इतका विसर्ग सुरु करण्यात आला आहे.दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणाच्या भीमा नदी पात्रात 95 हजार 200 क्युसेक इतका विसर्ग येत असल्याने उजनी धरण व्यवस्थापनाने हा निर्णय घेतलाय.

उजनी धरणाचे 16 दरवाजे हे 40 सेंटिमीटरने उघडण्यात आले आहेत.उजनी धरण हे एकूण 123 टीएमसी क्षमतेचा असून सध्या उजनी धरणात 111 पूर्णांक 77 टीमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

तर वीर धरणा मधून निरापात्रामध्ये 63 हजार 173 क्युसेक इतका विसर्ग सध्या सुरू आहे. उजनी धरणातून जाणारा विसर्ग आणि निरापात्राद्वाने येणारा विसर्ग याचा संगम इंदापूर तालुक्यातील नरसिंहपूर येथे होत असतो आणि पुढे हे भीमा नदीचे पात्र पंढरपूर मध्ये चंद्रभागे ला जाऊन मिळतं.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow