"एक हात मदतीचा" या उपक्रमांतर्गत शिव फाउंडेशनच्या वतीने भिगवण स्टेशन येथे वॉटर बॅगचे वाटप
आय मिरर : भिगवण (नारायण मोरे)
आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त व शुद्ध भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी जिल्हा परिषद पुणे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भिगवन स्टेशन येथे विद्यार्थ्यांना सुमारे 200 वॉटर बॅग व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना बंडगर म्हणाले कि शिव फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात. भिगवन स्टेशन येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल गरज होती,ही गरज लक्ष्यात घेऊन 200 बॉटल उपलब्ध करून दिल्या आणि भविष्यात देखील आपण शाळेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी देऊ असे आश्वासन देखील दिले.
यावेळी कार्यक्रम प्रसंगी भिगवण ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खाडे,दिनेश मारणे,किरण रायसोनी,अरविंद देवकाते, संतोष आब्बड,आकाश वनवे, पत्रकार निलेश गायकवाड तसेच श्री दीपक गुणवरे- अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शाळा भिगवण स्टेशन श्री महेंद्र मदने, सौ पुनम शेळके, सौ हसीना बारसकर, सौ कोमल मराळे - सदस्य शाळा व्यवस्थापन समिती भिगवन स्टेशन प्रास्ताविक -मुख्याध्यापक श्री भारत गायकवाड,शिक्षक -सौ लोखंडे मॅडम, सौ वनवे मॅडम, श्रीमती वीरकर मॅडम आदिजन उपस्थित होते. सूत्रसंचालन -श्री नवनाथ वनवे, आभार-श्री राहुल लंबाते यांनी मानले.
What's Your Reaction?