"फैसला आँन द स्पाॅट" आ.भरणे पुन्हा आले चर्चेत, नेमकं काय घडलं ?
आय मिरर
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांची वेगळी झलक इंदापूरकरांना पाहयाला मिळालीय. कोणतही काम असेल तर फैसला आँन द स्पाँट करण्यात भरणे तरबेज आहेत. शनिवारी दि.27 जुलै रोही हीतसचं काहीसं घडलं,अन् आमदार भरणे चर्चेत आले.
इंदापूर तालुक्यातील निमसाखर मध्ये दिव्यांग बांधव ज्ञानदेव रंगनाथ भुजबळ यांनी आ.भरणे यांना भेटण्यासाठी आणि आपलं गाऱ्हाणं त्यांच्या कानी घालण्यासाठी आपली सायकल थेट आ. भरणेंच्या चारचाकी समोर आणून लावली.त्यावर आ.भरणेंनी सर्व काही सोडून ज्ञानदेव भुजबळ यांची भेट घेतली,भुजबळ यांचं गाऱ्हाणं भरणेंनी ऐकून घेतले आणि तिथेच तहसीलदारांसह तलाठ्याला बोलावत सर्व शासकीय लाभ भुजबळ यांना द्या असे आदेशचं दिले.यावर भुजबळ यांनी ही समाधान व्यक्त केले.
निमसाखर हा या ठिकाणी आ.दत्तात्रय भरणे कार्यक्रमाकरीत येणार आहेर याची कुणकून भुजबळ यांना लागली.आमदारांना खास भेटण्यासाठी ते इथे आले. पाय नसल्यामुळे गर्दीत जाता येणार नाही. म्हणून त्यांनी आमदार भरणे यांच्या गाडीजवळ आपली सायकल गाडी आणून लावली. आपलं काम मार्गी लागेल याचा विश्वास मनी होता म्हणूनच आलो अशी बोलकी प्रतिक्रिया यावेळी ज्ञानदेव भुजबळ यांनी दिली.
What's Your Reaction?