बाह्यवळणावरील भुयारी मार्गाच वीरश्री मालोजीराजे भोसले प्रवेशद्वार नामांकन करा ! इंदापुरात सकल मराठा समाजाकडून राम शिंदेंना निवेदन
आय मिरर
इंदापूर बाह्यवळनावरील भुयारी मार्गाच वीरश्री मालोजीराजे भोसले प्रवेशद्वारचे नामांकन कराव याशिवाय या ठिकाणच्या स्मारकाच्या दुरुस्ती करता निधी उपलब्ध करून द्यावा अशा मागणीचे निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना इंदापूर मधील सकल मराठा समाजाकडून देण्यात आलेय.यावेळी सभापती राम शिंदे यांनी या ठिकाणच्या स्मारकाच्या दुरावस्थेची पाहणी देखील केली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की,अखंड हिन्दुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा विरश्री मालोजीराजे यांच्या पद स्पशनि पावन झालेली भूमी इंदापूर शहर आहे. तसेच इंदापूर शहरास व आजुबाजूच्या गावांना देखील ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
इंदापूर बाह्यवळण याठिकाणी विरश्री मालोजीराजे भोसले चौक याठिकाणी भव्य दिव्य असे विरश्री मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग क. ६५ च्या दुरुस्तीमध्ये व उड्डान पुलाचे काम करतेवेळी बाधीत होवून स्मारकाची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे सदरच्या स्मारकाचे भव्य दिव्य सुशोभीकरण करण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी आपल्या स्तरावरुन निधी उपलब्ध करून मिळावा.
What's Your Reaction?