भिम शक्ती सामाजिक संघटनेकडून शनिवारी इंदापूर बंद ची हाक,व्यापारी संघ देणार बंद विरोधात निवेदन...

Feb 9, 2024 - 07:49
Feb 9, 2024 - 08:19
 0  377
भिम शक्ती सामाजिक संघटनेकडून शनिवारी इंदापूर बंद ची हाक,व्यापारी संघ देणार बंद विरोधात निवेदन...

आय मिरर(देवा राखुंडे)

इंदापुर शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात भिम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष युवराज पोळ हे सोमवार (ता.05) पासून इंदापूर प्रशासकीय भवनाच्या समोर आमरण उपोषणास बसले असून उपोषणाच्या चौथ्या दिवसअखेरही प्रशासनाकडून योग्य दखल घेतली न घेल्याने शनिवार (ता.10) रोजी संघटनेच्या वतीने इंदापूर बंद ची हाक देण्यात आली आहे.     

याबाबत देण्यात आलेल्या निवेदनारूप शहरासह तालुक्यातील विविध अवैध धंदे सुरू असल्याने अनेकांचे प्रपंच देशोधडीला लागले आहेत, परिणामी महिला वर्गाला कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत आहेत.या घरातील भांडणांचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. उजनी जलाशयामध्ये बेकायदेशीरित्या वाळु उपसा सुरू आहे. विना परवाना कत्तलखाने देखील सुरू आहेत.हे सर्व अवैद्य धंदे तातडीने बंद व्हावे यासाठी भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करीत असल्याचे युवराज पोळ यांनी सांगितले.संघटनेच्या वतीने प्रशासनाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ शनिवार रोजी इंदापूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

व्यापारी संघ देणार निवेदन...

इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने यापूर्वीच कोणत्याही बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत प्रशासनाला आज शुक्रवार (ता.09) रोजी निवेदन देऊन बंद न पाळण्याबाबतच्या ठरावाची प्रत देण्यात येणार असून त्यांची अंमलबजाणी करीत बंद पाळण्यात येणार नाही.यासाठी प्रशासन व सामाजिक संघटना यांनी सहकार्य करावे. - भरत शहा, (अध्यक्ष इंदापूर शहर व्यापारी संघ)

इंदापूर शहरातील अवैध धंद्यावर नियमित कारवाई केली जात आहे.जरी कुठे चोरून असे धंदे चालू असतील तर त्यांच्यावरही कारवाई होईल.तसेच अवैध दारू विक्री बाबत उत्पादन शुल्क विभाग, वाळूच्या विषयात महसूल विभाग यांनाही कारवाईबाबतची माहिती देण्यात आली आहे.यामुळे अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत. याबाबत संबंधित उपोषणकर्ते यांनाही कळविण्यात आले आहे. जर व्यापारी महासंघाचा बंदला विरोध असेल तर त्यांना संरक्षण पुरवण्यात येईल - सूर्यकांत कोकणे (पोलिस निरीक्षक इंदापूर)

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow