Breaking News : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची आत्महत्या

Feb 9, 2024 - 07:07
 0  751
Breaking News : गोळीबारात अभिषेक घोसाळकरांचा मृत्यू, तर मारेकरी मॉरिसची आत्महत्या

आय मिरर

दहिसर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार करण्यात आलाय. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. गंभीर अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती सोमर आली आहे. 

मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिस भाईने अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या गोळीबारानंतर मॉरिस भाईनेही स्वत:वर चार गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाने उपनेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली. तेव्हा दहिसरमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow