त्या पर्समध्ये तब्बल अडीच लाखांचा ऐवज होता ! पण व्याहळीच्या पाटलांनी प्रामाणिकपणा दाखवला अन् मुद्देमाल परत केला

Jan 5, 2024 - 10:14
 0  749
त्या पर्समध्ये तब्बल अडीच लाखांचा ऐवज होता ! पण व्याहळीच्या पाटलांनी प्रामाणिकपणा दाखवला अन् मुद्देमाल परत केला

आय मिरर

व्याहळी येथील काकासाहेब शंकरराव पाटील यांनी एसटीमध्ये मध्ये घाई गडबडीत विसरलेली सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल रोख रक्कम असे जवळपास अडीच लाखांचा ऐवज असलेली पर्स त्या महिला प्रवाशास परत करून प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. याबद्दल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.    

निमगाव केतकी येथील व सध्या पुण्यात स्थायिक असलेल्या अनिता गोसावी या 31 डिसेंबर रोजी पुण्याहून आपल्या माहेरी निमगाव केतकी कडे येताना इंदापूर बसस्थानकावर उतरून इंदापूर -व्याहळी एसटीत बसल्यानंतर निमगावात उतरल्या. त्याच वेळेस काकासाहेब पाटील व्याहळीला घरी जाण्यासाठी चढले व त्यांना त्यांच्या शेजारी पर्स मिळाली. अनिता गोसावी घरी आल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली पर्स एसटीत विसरली. त्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केल्यानंतर काकासाहेब उर्फ दत्तात्रेय शंकरराव पाटील यांनी आपण घाबरु नका तुमची पर्स सापडली आहे असे कळवले.

पाटील यांनी ती पर्स प्रामाणिकपणे सुवर्णयुग सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ डोंगरे, ठेकेदार संजय गायकवाड, व्यापारी नितीन गांधी,लक्ष्मण फरांदे,अर्जुन हेगडे यांच्या उपस्थितीत परत केली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow