दारूच्या नशेत डॉक्टरचे रुग्णालयातच लोटांगण ! डॉक्टरवर गुन्हा दाखल 

Dec 6, 2024 - 13:02
 0  851
दारूच्या नशेत डॉक्टरचे रुग्णालयातच लोटांगण ! डॉक्टरवर गुन्हा दाखल 

आय मिरर

कर्तव्यावर असताना मद्यप्राशन करुन लोटांगण घातल्याचा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात घडला आहे.मद्यप्राशन करून ऑन ड्युटी लोटांगण घातल्यामुळे संबंधित डॉक्टरवर वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण मच्छिंद्रनाथ जाधव वय 47 असे संबंधित डॉक्टरचे नाव असून हा वादग्रस्त डॉक्टर अनेक कारणातुन कायम चर्चेत राहिलेला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयात रात्री सात वाजण्याच्या सुमारास जावेद अत्तार राहणार पिंपोडे बुद्रुक हे नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी गेले होते.त्यावेळी त्यांनी तेथील नर्सला डॉक्टर कुठे आहेत त्यांना भेटायचे आहे अशी विचारणा केली. त्यावर नर्स ने ड्युटीवर असणारे डॉक्टर अरुण जाधव हे प्रसुतीग्रहात आराम करीत असल्याचे सांगितले.रुग्णालयातील वॉर्ड बॉय आणि आतार डॉक्टर कडे गेले असता डॉक्टर दारूच्या नशेत जमिनीवर पडलेले आढळून आले.

त्यांच्या अंगावरील कपडे अस्ताव्यस्त होते तसेच रूम मधील साहित्य सुद्धा अस्ताव्यस्त पडले होते.आतार यांनी लगेच वाठार पोलिसांना फोन करून संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि डॉक्टर जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रसंगाने परिसरातील नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करून मद्यधुंद डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे.संबंधित प्रकारामुळे सातारा जिल्हा वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow