इंदापुरात वाळू माफी यांना प्रशासनाचा दणका ; 40 लाखांचं साहित्य नष्ट करीत सहा बोटी फोडल्या

आय मिरर
इंदापूर तालुक्यातील उजनी जलाशयात वाळू माफियांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस पथकाने मिळून तब्बल 40 लाखांहून अधिक किंमतीचं वाळू उत्खननाचं साहित्य नष्ट केलं आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी,उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार जीवन बनसोडे आणि पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
महसूल पथकाने माळवाडी जॅकवेल ते बिटरगाव वांगी दरम्यान पाठलाग करून वाळू माफियांच्या 6 बोटींवर कारवाई केली.या सर्व बोटी बुडवून नष्ट करण्यात आल्या, आणि वाळू माफियांना मोठा धक्का देण्यात प्रशासन यशस्वी झालं.ही संयुक्त कारवाई इंदापूर महसूल विभाग आणि पोलीस विभागाने केली आहे.
What's Your Reaction?






