पंढरीकडे निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला ! बस ला अपघात, पाच जणांचा मृत्यू अनेक जखमी
आय मिरर
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा बस या मार्गावरुन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
एक्सप्रेसवेवर रात्री बसला ट्रॅक्टरने मागून धडक दिली. त्यामुळे बस दरीत कोसळली. आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांवर मात्र काळाने घाला घातला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बसला दरीतून काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली . तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, रात्री १ च्या सुमारास मुंबई पुणे भाविकांच्या बसला ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. बसमध्ये असलेल्या ५४ भाविकांपैकी ४२ भाविकांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले तर तीन रुग्णांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर सात ते आठ जणांची प्रकृती गंभीर आहे आणि अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत.
बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोढा या परिसरातील असल्याचे समजते. भाविक काल रात्री बसने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते. पण वाटेतच आक्रीत घडले आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मुकले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?