"इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर" हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

Jul 16, 2024 - 11:48
Jul 16, 2024 - 11:48
 0  2048
"इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर" हर्षवर्धन पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

आय मिरर

भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाक व्यक्त काश्मीरशी केली आहे. धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला, असं विधान सांगलीच्या वाळवामध्ये केलं आहे, क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून खरंतर धैर्यशील माने हे निवडून आले आहेत,आणि त्यांच्या निवडीचा अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटलांनी इचलकरंजीला थेट पाकव्याप्त काश्मीर म्हणून उपमा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली असून माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.आजूबाजूला अदृश्य शक्ती वादळ होते,पण धैर्यशील माने निवडून आले,त्यामुळे पाक व्यप्त काश्मीर मध्ये त्यांनी विजयाची दिवा लावला असे विधान केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow