पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ दुचाकीस अपघात, वृध्दाचा मृत्यू..!

Dec 18, 2023 - 12:12
 0  1240
पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ दुचाकीस अपघात, वृध्दाचा मृत्यू..!

आय मिरर

पुणे -सोलापूर महामार्गावर भिगवण जवळील भादलवाडी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी स्वीफ्ट वाहनाने पुढे चाललेल्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली.यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील वृध्द गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.                 

हरीदास आनंदराव टकले वय 60 वर्षे रा. ढवळेवस्ती अकोले ता. इंदापूर जि पुणे असे अपघातात मरण झालेल्या दुचाकीवरील वृध्दाचे नाव आहे.स्विफ्ट चालक आनंद भागवत अवताडे वय 52 वर्षे (रा.संग्रामनगर अकलुज ता. माळशिरस जि. सोलापूर)यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणजित देविदास टकले 27 वर्षे, रा. दराडेवस्ती, अकोले ता. इंदापूर यांनी भिगवण पोलीसात फिर्याद दिली असून हा अपघात रविवारी दि.१७ डिसेंबर रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास भादलवाडी गावच्या हद्दीत प्रेम पान टपरी समोर झाला.                   

फिर्यादी रणजित टकले हे मोटारसायकल (नं MH 42 P 938) ही चालवित घेऊन जात असताना पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट कारने (नं MH 46 B 7615) भरधाव वेगाने येवून करून त्याची मोटारसायकलवरील हरीदास आनंदराव टकले (वय 60 वर्षे रा. ढवळेवस्ती अकोले ता. इंदापूर) यांस पाठीमागुन धडकली.यावेळी दुचाकीवरील हरिदास टकले यांना डोक्याला, डाव्या पायाला, उजव्या बाजुला, छातीला किरकोळ तसेच गंभीर मार लागला. यावेळी वाहनाचे नुकसान झाले.त्यांचेवर भिगवण येथील स्वामी समर्थ हॉस्पिटल येथे उपचार चालु असताना उपचारादरम्यान ते मयत झाले.पुढील तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहा फौजदार वारगड करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow