इंदापूरात हाॅटेल चालकाने जेवण नाकारलं,कंनेटर चालकाने असा धिंगाणा घातला की त्याची राज्यात चर्चा झाली

Sep 7, 2024 - 06:48
Sep 7, 2024 - 06:48
 0  3450
इंदापूरात हाॅटेल चालकाने जेवण नाकारलं,कंनेटर चालकाने असा धिंगाणा घातला की त्याची राज्यात चर्चा झाली

आय मिरर

पुण्याच्या इंदापूर मध्ये शुक्रवारी दि.06 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 च्या सुमारास मध्यधुंद कंटेनर चालकाचा थरार पहायला मिळाला.पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूरातील हिंगणगांव येथे रोड लगत असणा-या हाॅटेल गोकुळ येथे जेवण नाकारल्याच्या कारणातुन एका मध्यपान केलेल्या कंटेनर चालकाने नशेत कंटेनर चालवर एका कार सह हाॅटेलचे प्रचंड नुकसान केले आहे.

हॉटेल चारकानात जेवण नाकारल्याच्या रागातून या मध्य रुंद अवस्थेतील कंटेनर चालकांना हा धिंगाणा घातल्याची माहिती आहे आणि त्याने घातलेला हा धिंगाणा विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून राज्यभर पोहोचला आहे. इंदापूर पोलिसांनी या मध्यधंद अवस्थेतील चालकाला ताब्यात घेतला आहे तो कुठला आहे आणि त्याचं नाव काय हे मात्र समजू शकलेले नाही.

सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने MH 12 RN 4359 क्रमांकाचा हा कंटेनर त्यावरील चालक घेऊन निघाला होता. दरम्यान हिंगणगाव येथील हॉटेल गोकुळ वरती चालकाने वाहन थांबवले आणि त्याने हाॅटेल मध्ये जाऊन जेवण मागितलं.मात्र हॉटेल बंद असल्याचे सांगत त्याला जेवण नाकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तो नशा केलेल्या अवस्थेत होता अशी ही माहिती मिळत आहे. 

त्यानंतर संतापाचा पारा चढलेल्या या ड्रायव्हरने थेट आपला कंटेनर चालु करुन त्या ठिकाणी राडा घातला.यात त्या ठिकाणी उभ्या असलेल्या एम एच 12 GF 2421 क्रमांकाच्या एका कारचंही त्यांने प्रचंड नुकसान केले आहे.शिवाय कंटेनर च्या माध्यमातून त्याने हाॅटेल ची तोडफोड ही केल्याची माहिती मिळत आहे.

यानंतर घटनास्थळी इंदापूर पोलिस दाखल झाले असून या कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow