हर्षवर्धन पाटलांच्या सोशल मिडीया पोस्ट वरुन कमळ गायब ! हर्षवर्धन पाटील भाजपात नाराज ?

Jul 15, 2024 - 21:02
 0  1170
हर्षवर्धन पाटलांच्या सोशल मिडीया पोस्ट वरुन कमळ गायब ! हर्षवर्धन पाटील भाजपात नाराज ?

आय मिरर

भाजपाचे जेष्ट नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सद्या भाजपात नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांना आता सोशल मिडियात व्हायरल होणा-या एका पोस्ट ने खत पाणी दिलेय. मंगळवारी 18 जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून हर्षवर्धन पाटील हे बावडा येथील रत्नाई निवासस्थानी नागरिकांशी सुसंवाद साधण्यासाठी उपलब्ध असल्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. या पोस्ट वरती फक्त हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आहे मात्र या पोस्ट मधून कमळ चिन्ह आणि भाजपचे नेते गायब आहेत.

त्याहून पलीकडे ही पोस्ट हर्षवर्धन पाटील यांचे सुपुत्र नीरा भीमा सह.सा.का.संचालक राजवर्धन पाटील यांनीच शेअर केली आहे. त्यावर हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलयं. तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील विधानसभेची अपक्षाची तयारी करताहेत असेही बोललं जात आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow